IPL Auction 2025 Live

Asaram Bapu Seeks Interim Bail: कोविड 19 पॉझिटीव्ह आसाराम बापू याची कोर्टाकडे आंतरिम जामीनासाठी मागणी

आसारामसोबतच त्यांचे दोन सहकारी शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Asaram Bapu | (File Photo)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला असाराम बापू (Asaram Bapu Seeks) सध्या कारागृहात आहे. त्याला कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस संसर्ग आणि इतर अनेक आजारांवरील उपचार आदींसाठी अंतरीम जामीन (Interim Bail) मिळावा अशी आसाराम बापूची (Asaram Bapu Seeks Interim Bail) मागणी आहे. त्यासाठी त्याने राजस्थान उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आसाराम यांच्या आंतरीम जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) जोधपूर कडून अहवाल मागवला आहे.

न्यायाधीश संदीप मेहता, न्यायाधीश देवेंद्र कच्छवाहा यांच्या खंडपीठापुढे आसाराम याचे वकील वरिष्ठ अधिवक्ता जे एस चौधरी यांनी युक्तीवाद करत म्हटले की, कोविड 19 आणि इतरही अनेक आजारांच्या उपचारांसाठी जोधपूर बाहेरील उच्च आरोग्य केंद्रात उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे सजा स्थगिती पत्र सादर करत एस चौधरी यांनी आसाराम बापू याच्या आंतरीम जामिनासाठी मागणी केली. यावर खंडपीठाने लोक अपियोजक अनिल जोशी यांच्या युक्तीवादावर मेडिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात प्रकृती खराब झाल्यानंतर आसाराम बापू याला बुधवारी उशीरा महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी करण्यात आलेल्या तपासणीत ते कोरोना व्हायरस संक्रमित आढळून आले. फफ्फुसातील कोरोना संक्रमणामुळे त्यांना एम्स रुग्णालयात उपचार घेण्याबाबत सूचविण्यात आले. सध्या आसारामवर एम्स रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, आसाराम बापूला जोधपूर कोर्टाचा दणका; बलात्कार प्रकरणी जन्मठेप रद्द करण्याची याचिका फेटाळली)

दरम्यान, स्पेशल कोर्टाने पॉक्सो कायद्यान्वये  25 एप्रिल 2018 मध्ये आसारामबापू याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आसारामसोबतच त्यांचे दोन सहकारी शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दोन सहकाऱ्यांची सजा स्थगित झाली आहे. त्यानंतर दोघांना जामीन देण्यात आला आहे. आसाराम वर आरोप होता की त्याने जोधपूर येथील मनाई येथे आपल्या आश्रमातील गुरुकूलमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2013 मध्ये लैंगिक अत्याचार केले. प्रदीर्घ काळ झालेल्या या सुनावणीत आसाराम दोषी आढळला. त्याच्याविरुद्ध जुलै 2018 मध्ये 44 पानांची आपील दाखल करण्यात आली होती. शरद आणि शिल्पी यानेही आपल्या सजेविरुद्ध आपील केले आहे.