COVID-19 in India: भारतात वाढत आहे कोविड 19 रूग्णांची संख्या; Omicron XBB.1.16 वर लक्ष ठेवावं लागेल; WHO चा इशारा

COVID | File Image

भारतामध्ये पुन्हा दिवसागणिक कोविड 19 रूग्णसंख्या (COVID-19 in India) वाढत आहे. सध्या मागील 5-6 महिन्यातील उच्चांकी एका दिवसातील रूग्ण समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटना च्या माहितीनुसार, या रूग्णसंख्यावाढीमागे लेटेस्ट सबव्हेरिएंट Omicron XBB.1.16 असल्याचा अंदाज आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. WHO च्या माहितीनुसार, XBB.1.16 हा सहावा व्हेरिएंट आहे. जगभरात सध्या कोरोना रूग्णसंख्या आणि रूग्ण दगावण्याचा दर खालावत असला तरीही भारतासारख्या देशात कोरोना रूग्ण पुन्हा वाढत आहेत.

Maria Van Kerkhove, ज्या WHO साठी Covid-19 technical lead म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या मते, XBB.1.16 मागील काही महिन्यांपासून पसरत आहे. आता त्याच्यावर लक्ष द्यावे लागेल. 22 देशांमधून प्रामुख्याने भारतातून त्याचे 800 सिक्वेंसेस दिसून येत आहेत. XBB.1.16 हा XBB.1.5 सारखाच आहे. पण केवळ त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये अधिकचे बदल झाले आहेत. लॅब स्टडीज मध्ये XBB.1.16 द्वारा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचं पहायला मिळालं आहे. असेही Maria Van Kerkhove ने सांगितले आहे. नक्की वाचा: New Covid-Like Virus: वटवाघुळांमध्ये आढळला कोविड सारखा विषाणू , मानवांना करू शकतो संक्रमित, शास्त्रज्ञांनी दिली चेतावणी .

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, XBB.1.5 अशा सॅच्युरेशनपर्यंत पोहोचले आहे, जे 87.9 टक्के नमुने बनवते. इतर तीन ओमिक्रॉन सबवेरियंट XBB.1.9.1, XBB, आणि XBB.1.5.1 च्या दृष्टीने ही सकारात्मक वाढ आहे. असे एजन्सीने त्यांच्या द्विसाप्ताहिकाच्या अहवालात नोंदवले आहे.

दरम्यान भारतामध्ये आज मागील 184 दिवसांमधील सर्वाधिक 24 तासांतील कोरोना रूग्ण समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, एका दिवसात 3846 नवे रूग्ण 24 तासांत समोर आले आहेत.  तर अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्ण 18,389 आहेत. केरळ, हरियाणा, दिल्ली, राजस्थान मधून एकूण 5 जण मागील 24 तासांत दगावले आहेत. भारतासोबतच सध्या कतार, इराण, कुवेत,यूएअई मध्ये देखील कोविड रूग्ण वाढत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif