Covaxin Update: भारत बायोटेकच्या कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला देशात येत्या काही दिवसांत AIIMS Patna मधून होणार सुरूवात
AIIMS Patna मध्ये या आठवड्यात मानवी चाचणीला सुरूवात होईल.
भारतामधील कोविड 19 वरील ICMR आणि भारत बायोटेकची संभाव्य लस Covaxin आता देशात मानवी चाचणीसाठी सज्ज झाली आहे. TOI च्या रिपोर्ट नुसार, पहिल्या टप्प्यात 375, त्यानंतर 750 जणांवर तपासली जाणार आहे. त्यामुळे DCGI कडून मानवी चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांना परवानगी असलेली ही लस आता एकूण अंदाजे 1000 लोकांना टोचली जाणार आहे. देशभरामध्ये एकूण 12 मेडिकल संस्थांना आयसीएमआर कडून निवडण्यात आले आहे. AIIMS Patna मध्ये या आठवड्यात मानवी चाचणीला सुरूवात होईल. Bharat Biotech Vice-President Dr V.K. Srinivas Takes First Shot Of COVID-19 Vaccine? COVAXIN च्या निर्मात्यांनी फेटाळला दावा, जाणून घ्या सत्य.
भारतामध्ये Covaxin या लसीचा प्राण्यांवर ट्रायल सकारात्मक आल्याने आता मानवी चाचणी आणि त्याच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 1000 त्यानंतर पुढील टप्प्यांत मानवी चाचणीचे प्रमाण देखील वाढवले जाणार आहे. दरम्यान एकूण 3 टप्प्यांमधून जाणार्या या लसीला पुढे निकाल स्पष्ट करण्यासाठी अंदाजे 6-8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हैदराबादच्या Nizam's Institute of Medical Sciences मध्येही आता मानवी चाचणीसाठी उमेदवार निवडण्याचं काम सुरू झालं आहे.
सध्या कोरोना व्हायरस SARS-CoV-2 चे काही नमुने निष्क्रिय करून त्यांना सुदृढ शरीरात इंजेक्ट केले जाणार आहेत. दरम्यान नव्या व्हायरसचा अटॅक झाल्यानंतर आता शरीरात अॅन्टीबॉडीज तयार होतात का? त्या सामना करू शकतात का? हे तपासलं जाणार आहे. ही लस 22 ते 50 या वयोगटातील व्यक्तींना दिली जाणार आहे.
आयसीएमआर कडून 15 ऑगस्ट पर्यंत Covaxin या लसीचे अहवाल तपासल्या जाण्याचे आणि ती बाजारात उपलब्ध करण्यासाठी सादर करण्याबाबत एका पत्राद्वारा माहिती देण्यात आली होती. मात्र नंतर जागतिक पातळीवर असणार्या प्रोटोकॉल प्रमाणेच ही लस निर्माण केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूर मधून या लसीसाठी उमेदवारांवर चाचणी केली जाणार आहे.