COVAXIN बाबत मोठी दिलासादायक बातमी; SARS-CoV-2 सोबतच Double Mutant Strain वरही प्रभावी असल्याचा निष्कर्ष ICMR कडून जारी

त्यावर लस प्रभावी ठरल्याचं आता सांगण्यात आलं आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारतमध्ये कोरोना वायरस्च्या दुसर्‍या प्रचंड वेगात आलेल्या लाटेने आरोग्य यंत्रणेचे कंबरडे मोडलं असताना आता भारतीयांसाठी आज आयसीएमआर (Indian Council of Medical Research) ने एक आनंददायी बातमी दिली आहे. आयसीएमआर च्या अभ्यासानुसार कॉवॅक्सिन (COVAXIN) ही भारत बायोटेकची (Bharat Biotech) स्वदेशी लस SARS-CoV-2 सोबतच त्याच्या म्युटेशनवर ही प्रभावी आहे. या लसीच्या प्रभावाने डबल म्युटेट स्ट्रेन देखील रोखता येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ICMR NIV ने COVAXIN ची युके आणि ब्राझील व्हेरिएंटवर चाचणी घेतली आहे. सध्या भारतात आणि जगभरात काही देशांमध्ये SARS-CoV-2 चा B.1.617 हा दबल म्युटंट स्ट्रेन आढळला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून त्याच्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली होती. पण त्याला आयसोलेट करून त्याच्यावर कोवॅक्सिनच्या चाचण्या घेतल्यानंतर परिणाम सकारात्मक आल्याचा दावा आयसीएमआर ने केला आहे.

भारतामध्ये सीरमच्या कोविशिल्ड सोबत आयसीएमआर व भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन ला तातडीची मंजुरी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने त्यांच्याकडून 700 मिलियन डोस प्रतिवर्षी बनवल्या जातील अशी माहिती दिली आहे. आता महाराष्ट्रातही हाफकीन मध्ये भारत बायोटेकची ही लस उत्पादीत केली जाणार आहे. कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी BCG Vaccine वृद्धांसाठी फायदेशीर ठरेल; ICMR च्या अभ्यासातून खुलासा.

येत्या 1 मे 2021 पासून भारतामध्ये आता 18 वर्षांवरील सार्‍यांनाच लस दिली जाणार आहे. या लसीकरणामध्ये तुटवटा जाणवू नये म्हणून केंद्र सरकारने Serum Institute of India ला निर्मीती वाढवण्यासाठी 3 हजार कोटी तर भारत बायोटेकला 1567.50 कोटींची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif