गोवा येथील सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी आहे. तर गोवा (Goa) हे कोरोनामुक्त झाले असून येथील सर्व कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

प्रमोद सावंत (Photo Credits-Twitter)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम ठेवले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्यातील लॉकडाउनचे नियम अधिक कठोर पद्धतीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स दिवसरात्र काम करत आहे. तसेच सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी आहे. तर गोवा (Goa) हे कोरोनामुक्त झाले असून येथील सर्व कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती मुख्यमंत्रीगोवा येथील सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह, मुख्यमंत्री प्रमोद सावंत  यांनी दिली आहे.

गोव्यात 3 एप्रिल नंतर एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याचे प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आता गोवा हे कोरोनामुक्त झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. त्याचसोबत डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे हे सर्वकाही साध्य झाल्याने त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. तर काही दिवसांपूर्वी स्थानिक सरकारकडून मच्छिमारांना लॉकडाउनच्या काळात मासे विक्री संदर्भात अॅडव्हायजरी जारी केली होती. मात्र मासे विक्री करताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात यावे अशा सुचना सुद्धा देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरीच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्याचसोबत 20 एप्रिल पासून उद्योगधंद्यांना सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement