Coronavirus: अजीम प्रेमजी फाउंडेशन आणि विप्रो कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत करणार 1125 कोटी रुपयांची मदत
यात मोठा हिस्सा प्रेमजी फाउंडेशनचा असणार आहे. 1125 रुपयांच्या या रकमेपैकी विप्रो लिमिटेड 100 कोटी रुपये, विप्रो इंटरप्राइजेस 25 कोटी आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशन 1000 कोटी रुपये देणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत जगभरातील उद्योजक, सेलीब्रेटी आणि विविध क्षेत्रातील लोक त्या त्या देशांना मदत करत आहे. यात सर्वसामान्य जनतेचाही समावेश आहे. भारतातही अनेक उद्योजक आणि सेलिब्रेटी मंडळींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीत आपापल्या परीने मदत जमा केली आहे. या मदतगारांच्या यादीत आता आयटी कंपनी विप्रो लिमिटेड (Wipro Ltd) आणि विप्रो एंटरप्राइजेस लिमिटेड (Wipro Enterprises Ltd), अजीम प्रेमजी फाऊंडेशन (Azim Premji Foundation) यांचेही नाव जोडले गेले आहे. या दोन्ही संस्थांनी मिळून कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत 1125 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ही मदत या दोन्ही संस्था पीएम केयर्स फंडात जमा केली जाणार नाही हे विशेष.
विप्रोकडून देण्यात आलेल्या एका अधिकृत प्रतिक्रियेत म्हटले आहे की, विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्राइजेस आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशन या दोन्ही संस्था मिळून 1125 कोटी रुपये मदत म्हणून देणार आहेत. यात मोठा हिस्सा प्रेमजी फाउंडेशनचा असणार आहे. 1125 रुपयांच्या या रकमेपैकी विप्रो लिमिटेड 100 कोटी रुपये, विप्रो इंटरप्राइजेस 25 कोटी आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशन 1000 कोटी रुपये देणार आहे.
ही रक्कम वार्षिक सीएएसआर रकमेपेक्षा वेगळी आहे. सोबतच अजीम प्रेमजी फाऊंडेशनच्या नेहमीच्या दान खर्चाच्याही ही रक्कम वेगळी आहे. विप्रो ग्रुपने म्हटले आहे की, कोवीड19 पासून निर्माण झालेल्या अभूतपूर्व आरोग्य आणि मानवी समुहावरील संकटाकडे पाहता विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्राइजेस आणि अजीम प्रेमजी फाउंडेशन मिळून 1125 कोटी रुपयांची मदत करणार आहे. हा सर्व पैसा कोरोना व्हायरस पीडित नागरिकांच्या आरोग्याच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. त्यासाठी अजीम प्रेमजी फाउंडेशनेच 1600 कर्मचाऱ्यांची एक टीम कार्यरत असणार आहे. (हेही वाचा, Coronavirus च्या लढाईत मुकेश अंबानी यांचा मदतीचा हात; रिलायन्सकडून PM CARES Fund साठी 500 कोटींची मदत)
एएनआय ट्विट
दरम्यान, अजीम प्रेमजी फाउंडेशन द्वारा कोविड 19 संकटाचा समाना करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, या वृत्तात काहीही तथ्य नव्हते. ते वृत्त चुकीचे आणि 2019 मध्ये केलेल्या एका मदतीसंदर्भातील होते.