Coronavirus Update in India: महाराष्ट्र, नवी दिल्ली, तमिळनाडूसह जाणून घेऊया अन्य राज्यांची COVID-19 रुग्णांची एकूण संख्या

भारतात 5247 रुग्णांपैकी 4714 उपचार घेत आहेत. तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतात नवीन कोरोना बाधित रुग्णांसह आज दिवसभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 5,247 वर गेली आहे. त्यात 24 तासांत 485 नवीन रुग्णांचा समावेश आहे. तसेच 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून येणारा काळ हा भारतासाठी खूपच चिंताजनक असल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. भारतात 5247 रुग्णांपैकी 4714 उपचार घेत आहेत. तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1135 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 117 कोरोना रुग्णांनी या विषाणुवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र अद्याप तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. मात्र, येत्या काळात नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. Coronavirus च्या सर्व टेस्ट मोफत देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

भारतातील राज्यांप्रमाणे कोरोना बाधितांची आकडेवारी:

S. No. Name of State / UT Total Confirmed cases (Including 71 foreign Nationals) Cured/Discharged/

Migrated

Death
1 Andhra Pradesh 305 5 4
2 Andaman and Nicobar Islands 10 0 0
3 Arunachal Pradesh 1 0 0
4 Assam 27 0 0
5 Bihar 38 0 1
6 Chandigarh 18 7 0
7 Chhattisgarh 10 9 0
8 Delhi 576 21 9
9 Goa 7 0 0
10 Gujarat 165 25 13
11 Haryana 147 28 3
12 Himachal Pradesh 18 2 1
13 Jammu and Kashmir 116 4 2
14 Jharkhand 4 0 0
15 Karnataka 175 25 4
16 Kerala 336 70 2
17 Ladakh 14 10 0
18 Madhya Pradesh 229 0 13
19 Maharashtra 1018 79 64
20 Manipur 2 0 0
21 Mizoram 1 0 0
22 Odisha 42 2 1
23 Puducherry 5 1 0
24 Punjab 91 4 7
25 Rajasthan 328 21 3
26 Tamil Nadu 690 19 7
27 Telangana 427 35 7
28 Tripura 1 0 0
29 Uttarakhand 31 5 0
30 Uttar Pradesh 343 26 3
31 West Bengal 99 13 5
Total number of confirmed cases in India 5274* 411 149

तर कोरोना व्हायरसचे सध्या जगभरात 13 लाखाहून अधिक बाधित रूग्ण आहे. चीनमध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस युरोपातील इटली, स्पेन, जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलं या प्रत्येक देशांमध्ये लाखभरापेक्षा अधिक रूग्ण आहेत. सध्या युरोपापाठोपाठ अमेरिका हे कोरोना व्हायरस संसर्गाचं केंद्र बनलं आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाचे दहा हजाराहून अधिक बळी गेले आहेत. तर इटलीमध्ये 16 हजार आणि स्पेन मध्ये 13 हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now