Coronavirus Update 26 May: मागील 24 तासात कोरोनाचे 6,535 नवे रुग्ण आणि 146 मृत्यूची नोंद; देशातील COVID 19 रुग्णसंख्या 1,45,380 वर

यापैकी 80722 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत तर 4167 जणांचा मृत्यू झाला असून 60491जणांनी आजवर कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus (Photo Credit: Twitter)

मागील 24 तासांत कोरोना व्हायरसचे 6,535 नवे रुग्ण आणि 146 मृत्यू नोंदवले गेले आहेत, यानुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,45,380 इतकी झाली आहे. यापैकी 80722 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत तर 4167 जणांचा मृत्यू झाला असून 60491 जणांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे (Ministry Of Health & Family Affairs) माहिती देण्यात आली आहे. आज, 26 मे 2020 सकाळी 8 वाजेपर्यंतचे हे अपडेट्स आहेत. जगभरातील कोरोना व्हायरस रुग्णांची अधिक संख्या असलेल्या 10 देशांच्या यादीत भारताचे नाव सध्या शेवटच्या स्थानी दाखल झाले आहे. पहिल्या 10 देशांमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी इराण हा देश होता. मात्र, भारताने सोमवारी इराणला मागे टाकत या यादीत प्रवेश केला.

भारतात कोरोनाच्या संक्रमित राज्यांमध्ये महाराष्ट्राचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे सद्य घडीला महाराष्ट्रात एकूण 52,667 रुग्ण आढळले असून त्यातील 1695 जणांचा बळी गेला आहे. तर महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांचा टॉप 5 कोरोनासंक्रमीत राज्यांच्या यादीत समावेश आहे. भारतातील अन्य राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत यांची एकूण आकडेवारी जाणून घ्या.

ANI ट्विट

दरम्यान, जगभरात आतापर्यंत 5.3 मिलियन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 3 लाख 42 हजार जणांचा या जीव घ्या विषाणूने बळी गेला आहे. यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्ण हे अमेरिकेत आढळले आहेत, अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आजचा आकडा हा 16,62,375 इतका असून आतापर्यंत अमेरिकेत एकूण 98,218 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यापाठोपाठ ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेन या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समजतेय.