गोवा राज्य कोरोनामुक्त झाले तरीही पर्यटनासंबंधित गोष्टींवर 17 मे पर्यंत बंदी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी तेथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. त्यानंतर आता गोव्यात येत्या 17 मे पर्यंत पर्यटनासंबंधित कोणत्याच गोष्टी सुरु राहणार नसून त्यावर बंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांच्या संख्येसह बळींचा आकडा वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी देशात येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचसोबत रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार राज्य आणि जिल्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आले असून कोरोनाची परिस्थिती पाहून काही ठिकाणी लॉकडाउनचे आदेश शिथिल करण्यात आले आहेत. याच दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोवा (Goa) हे राज्य देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य ठरले आहे. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी तेथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. त्यानंतर आता गोव्यात येत्या 17 मे पर्यंत पर्यटनासंबंधित कोणत्याच गोष्टी सुरु राहणार नसून त्यावर बंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रमोद सावंत यांनी असे म्हटले आहे की, गोव्यात 3 एप्रिल नंतर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच रुग्णांना 17 एप्रिल पर्यंत डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पर्यटनासंबंधित गोष्टींवर निर्बंध कायम राहणार आहेत. त्याचसोबत सावंत यांनी गोव्यात मसाज पार्लर, सिनेमागृह, नाईट क्लब अन्य गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. गोवा कोरोनामुक्त झाल्याने तो आता ग्रीन झोन मध्ये दाखल झाला आहे. परंतु गोव्यात कोरोना संबंधित नियमांचे पालन करण्यात येत आहे.(Coronavirus: देशात 24 तासात कोरोनाचे 2293 नवे रुग्ण; COVID19 संक्रमितांचा आकडा 37,336 तर मृतांची संख्या 1218 वर, जाणून घ्या आजची आकडेवारी)
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 37336 वर पोहचला आहे. तर 1218 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचसोबत नागरिकांना सुद्धा घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी नवी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली असून नॉन कोविड ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत.