Lockdown: कळलं का? केशकर्तनालय, हेअर सलून, दारु विक्री दुकाने बंदच राहणार आहेत; गृह मंत्रालयाचे स्पष्टीकरण

लॉकडाऊन (Lockdown) काळात दुकाने सुरु ठेवण्यास दिलेली सशर्थ सवलत ही केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानाशी संबंधित आहे. ही सवलत केशकर्तनालय (Barber Shops), हेअर सलून (Hair salons), ब्युटी पार्लर या दुकानसांठी नाही. सलूनची दुकाने अथवा मद्यविक्री (Liquor Shops) करणारी दुकानं सुरु ठेवण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन काळात ही दुकाने नियमानुसार बंदच राहतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे.

दरम्यान,  केवळ मध्य विक्री करणारी दुकानं, हेअर सलून अथवा केशकर्तनालय इतकेच बंद असणार नाही तर, हॉटेल आणि रेस्टरंट्सही बंद असणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्याने दिलेल्या आदेशांच्या स्पष्टीकरणात याबाबत माहिती दिली आहे.

एएनआय ट्विट

लॉकडाऊन काळात दुकाने सशर्थ सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सवलत दिली. तसा आदेशही केंद्र सरकारने काढला. मात्र, आदेशात उल्लेख करण्यात आलेल्या बाबींसदर्भात नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे कोणती दुकाने सुरु करायची आहेत आणि कोणती बंद ठेवायची आहेत याबाबत स्पष्टता होत नव्हती. दुकानदारांनाही अनेक प्रश्न होते. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्या सलील श्रीवास्तव यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार, देशातील सर्व नोंदणीकृत दुकाने. रहिवाशी कॉम्प्लेक्स मधील दुकाने सशर्थ म्हणजेच अटी लागू या स्वरुपात सुरु ठेव्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, स्विमिंग पूल्स, कल्ब्स, मल्टी ब्रँड, सिंगल ब्रँड मॉल्स, बाजार संकुलातील दुकाने, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे सुरु करण्यावर बंदी आहे.