RBI रेपो रेट दरात 0.04% कपात, कर्जदारांचे EMI कमी होण्याची शक्यता; गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती
कोरना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारं यांच्या प्रमाणेच आता आरबीआयनेही प्रयत्न सुरु केला आहे.
रेपो रेट दरात 0.04% कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने घेतला आहे. आरबीआय (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेट दरात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशभरातील अनेक कर्जदारांचे कर्जाचे हप्ते (EMI) कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरबीआयने रिवर्स रेपो रेटही कमी करत त्यात 3.35% इतका केला आहे. कोरना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारं यांच्या प्रमाणेच आता आरबीआयनेही प्रयत्न सुरु केला आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की रेपो रेट 4.4% मध्ये कपात करुन तो 4% करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेटही 3.35% इतका करण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्ज कमी व्याजदरात उपलब्द होईल. शक्तिकांत दास यांनी पुढे सांगितले की, देशातील महागाई वाढण्याची शक्यता आहे. पण, असे असले तरी भारताची अर्थव्यवस्था निर्भर राहीन, असेही दास म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच सहभाग, शरद पवार, सीताराम येच्युरी, एम के स्टॅलिन यांचीही उपस्थिती)
ट्विट
यंदा देशात इंधन, वीज यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. डाळींच्या किमती हासुद्धा एक मोठा चिंतेचा विषय आहे. देशातील या स्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. पहिल्या तिमाहीत विकास दर घसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही शक्तिकांत दास म्हणाले.
ट्विट
शक्तिकांत दास यांनी पुढे बोलताना सांगितले की, मार्च महिन्यात औद्योगिक उत्पन्न 17 टक्क्यांनी घटले. तर मॅनिफॅक्चरिंगमध्येही 21 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. कोर इंडस्ट्रीज आउटपुटमध्येही 6.5 टक्क्यांची घट झाली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 2020-21 मध्ये भारताचे विदेशी चलन भांडार 9.2 बिलीयन डॉलर इतके वाढू शकते. भारताचे विदेशी चलन भांडार सद्यास्थितीत 487 बिलियन डॉलर इतके आहे.