Coronavirus: सरकारी दवाखन्यांसाठी Covishield लस 400 रुपयांना खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत; Serum Institute कडून दरपत्रक जारी

वास्तवात या लसींची किंमत 750 ते 1500 इतकी आहे. सरकारच्या नवीन धोरणाचा एक भाग म्हणून एकूण लस डोसपैकी 50 टक्के केंद्रे केंद्रासाठी राखीव ठेवली जातील आणि उर्वरित विभागणी राज्य आणि खासगी रुग्णालयांमध्ये केली जाईल.

Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) द्वारा कोविशिल्ड (Covishield) कोरोना लसीबाबत नवे दरपत्रक जारी करण्यात आले आहे. या दरपत्रकानुसार राज्य सरकारांना कोरोना लस ( Corona Vaccine) प्रती डोस 400 रुपये दराने मिळणार आहे. खासगी रुग्णालयांना ही लस 600 रुपये प्रती डोस दराने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांच्या तुलनेत केंद्र सरकारला मात्र ही लस अवघ्या 150 रुपयांत मिळणार आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ने अधिकृत दरपत्रक जारी करुन ही माहिती दिली. देशात 1 मे 2021 पासून कोरोना लसीकरणाचा नवी श्रृंखला सुरु होणार आहे. त्यानुसार 1 मेपासून देशातील 18 वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना लस घेता येणार आहे. अर्थात लसीकरणासाठी काही अटी लागू असणारच आहेत.

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ने म्हटले आहे की, जगभरातील इतर सर्व लसींपेक्षा ही लस अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे. वास्तवात या लसींची किंमत 750 ते 1500 इतकी आहे. सरकारच्या नवीन धोरणाचा एक भाग म्हणून एकूण लस डोसपैकी 50 टक्के केंद्रे केंद्रासाठी राखीव ठेवली जातील आणि उर्वरित विभागणी राज्य आणि खासगी रुग्णालयांमध्ये केली जाईल. लसीकरण केंद्रे जेव्हा सर्व प्रौढ नागरिकांसाठी उघडली जातील तेव्हा सुमारे 1.2 दशलक्ष डोसची आवश्यकता असणारआहे. सध्या बर्‍याच राज्यांनी कोविड लसीकरणात पुरेशी लस उपलब्ध नसल्याने कमतरता दर्शविली आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccine: आतापर्यंत कोरोना विषाणू लसीचे 44 लाख डोस गेले वाया, तामिळनाडू आघाडीवर; RTI मधून धक्कादायक बाब समोर )

केंद्र सरकारने लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना 4,500 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी म्हटले आहे की, सध्या कोविशिल्ड लसीचे 15 ते 20 टक्के डोस मार्केटमध्ये तातडीने उपलब्ध करुन दिले जातील.