Coronavirus रुग्णाचा मृतदेह चक्क प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून रिक्षा मध्ये टाकून नेला, तेलंगणा येथील धक्कादायक घटना (See Photos)

प्राप्त माहितीनुसार हा रुग्ण तेलंगणा येथील निजामाबाद सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता.

Coronavirus Patient Deadbody In Auto (Photo Credits: ANI)

देशात एकीकडे कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Cases In India)  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, सोबतच  रोज निदान 200 हुन अधिक मृत्यू होत आहेत. या कोरोना मृतांच्या शवाला (Coronavirus Patient Deadbody) हातळण्याबाबत अगोदरच सरकारने मार्गदर्शक गाईडलाईन जाहीर केल्या आहेत. मात्र सध्या तेलंगणा (Telangana) मध्ये घडलेला एक प्रकार या गाईडलाईनला फाट्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट उदाहरण ठरत आहे. काही तासांपासून तेलंगणा मधील एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतोय ज्यात एका कोरोना मृताचे शव हे प्लास्टिक मध्ये गुंडाळवून चक्क एका ऑटो रिक्षातून नेले जात आहे. प्राप्त माहितीनुसार या रुग्णाचा तेलंगणा येथील निजामाबाद सरकारी हॉस्पिटल येथे गुरुवारी उपचार घेताना मृत्यू झाला होता, त्यानंतर ऍम्ब्युलन्स मिळायला वेळ लागत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रिक्षा मध्ये टाकून मृतदेह स्म्शानातभूमीवर नेल्याचे समजतेय. भारतात कोरोनाचा हाहाकार! 28,637 नव्या रुग्णांसह देशात COVID-19 रुग्णांची एकूण संख्या 8,49,553 वर

निजामाबाद सरकारी हॉस्पिटलचे अधिकारी, डॉ. एन. राव यांनी या संदर्भात ANI ला दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचा एक नातेवाईक याच हॉस्पिटल मध्ये कामाला आहे. त्याने या व्यक्तीच्या मृतदेहाची मागणी करताच आम्ही ते शव त्याच्याकडे सोपवले होते, मात्र रुग्णवाहिकेसाठी वाट न पाहता त्यानेच कोरोना मृतदेह रिक्षामध्ये टाकून नेला. या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे त्यात जर तो दोषी आढळल्यास उचित कारवाई करण्यात येईल.

पहा ट्विट

दरम्यान, सरकारी सूचनांनुसार, कोरोना रुग्णांच्या मृतदेहाला हाताळताना सुद्धा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेह हा योग्य प्रकारे कव्हर करून तो पोलिसांच्या देखरेखीत हॉस्पिटल मधून स्मशानभूमीत नेला जावा, कोणत्याही धर्माच्या रुग्णाचा अंत्यविधी दहन करूनच केला जावा असे नियम यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहेत.