Mann Ki Baat: भारताची लोकसंख्या जास्त असूनही कोरोना इतर देशांप्रमाणे पसरला नाही हे खरे भारतीयांचे यश- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताची लोकसंख्या जास्त असूनही इदत देशांप्रमाणे भारतात कोरोना व्हायरस पसरला नाही असे पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात सांगितले.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

देशात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोरोना बाधितांच्या संख्येत लाक्षणिक वाढ होत आहे. यामुळे काल (30 मे) रोजी लॉकडाऊन 5.0 (Lockdown 5.0) ची घोषणा करण्यात आली. यानुसार 31 मे पर्यंतचा लॉकडाऊन आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat)  या कार्यक्रमातून विशेष माहिती दिली. भारताची लोकसंख्या जास्त असूनही इदत देशांप्रमाणे भारतात कोरोना व्हायरस पसरला नाही असे पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात सांगितले. तसेच इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांचे मृत्यूदरही कमी आहे हे जगाच्या तुलनेत भारतीयांचे मोठे यश आहे असेही मोदी म्हणाले.

असे असताना देखील भारतीयांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला असून भारतीयांचे एकजूटच या कोरोनाला मात देऊ शकते असे त्यांनी सांगितले. सेवा परमो धर्म असे सांगत देशभरातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांसारख्या कोविड योद्धांचे नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. संकल्पशक्ती, सेवाशक्ती हीच देशवासियांची मोठी ताकद आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतात कोरोनाचा हाहाकार! 8380 नव्या COVID-19 रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर

या कोविड योद्धाप्रमाणे रेल्वे, बस या कर्मचा-यांनी अनेकांना आपल्या गावी पोहोचवले. या कठीण प्रसंगी केवळ श्रीमंतांनी नाही तर सर्वसामान्य लोकांनी देखील गरीबांना मदत केली.आत्मनिर्भर भारतासाठी संपूर्ण देशवासियांनी हे मिशन हाती घेतले असून त्या दिशेने काम करत आहेत. ही खरच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे मोदी म्हणाले.

केंद्र सरकारकडून Lockdown मध्ये कन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री 9 ते 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.