प्रवाशांनी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत विमानाचे तिकिट बुकिंग केले असल्यास रिफंड 3 आठवड्यात मिळणार
नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ज्या प्रवाशांनी पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन दरम्यान तिकिट बुकिंग केले आहे त्यांना पैसे परत केले जाणार आहेत.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले होते. या काळात देशाअंतर्गत आणि इंन्टरनॅशल विमान उड्डाणे सुद्धा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ज्या नागरिकांनी प्रवासाचा प्लॅन केला होता त्यांना त्या ठिकाणी जाणे सुद्धा रद्द करावे लागले. मात्र आता प्रवाशांनी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत विमानाचे तिकिट बुकिंग केले असल्यास त्यांना त्याचे रिफंड 3 आठवड्यात परत मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ज्या प्रवाशांनी पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन दरम्यान तिकिट बुकिंग केले आहे त्यांना पैसे परत केले जाणार आहेत.
विमानाचे तिकिट जरी प्रवाशांकडून रद्द करण्यात आले तरीही त्यांच्याकडून कोणताही अतिरिक्त शुल्क कंपनीकडून वसूल केला जाणार नाही आहे. तसेच प्रवाशाला तिकिटाची संपूर्ण रक्कम देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन वाढवण्याचे आदेश देत येत्या 3 मे पर्यंत कायम ठेवले आहेत. त्यामुळे ज्या प्रवाशांनी 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत देशाअंतर्गत आणि इंन्टरनॅशनल तिकिट बुकिंग केले असल्यास त्यांना सुद्धा तिकिट रद्द केल्यास त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही आहे. परंतु त्यांना ही संपूर्ण तिकिटाची रक्कम परत केली जाणार आहे.(Social Distancing चं महत्त्व सांगणारा लहान मुलांचा अनोखा खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला व्हिडिओ)
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच विविध स्तरातून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मदत केली जात आहे. आतापर्यंत भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12380 वर पोहचला असून 414 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1489 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.