Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत 9985 नवे कोरोनाबाधित रूग्ण; COVID 19 ची लागण झालेल्यांचा एकूण आकडा 276583 वर !
यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 133632 इतकी आहे तर 135206 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
भारतामध्ये आज (10 जून) कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मागील 24 तासांत 9985 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 279 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे भारतामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 276583 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 133632 इतकी आहे तर 135206 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुर्देवाने आत्तापर्यंत 7745 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अद्याप कोरोना व्हायरसमुळे झपाट्याने पसरणार्या कोव्हिड 19 या आजारावर ठोस औषध किंवा लस नसल्याने नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळूनच स्वतःचा या जीवघेण्या आजारापासून बचाव करायचा आहे.
भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र, दिल्ली राज्यामध्ये आहेत. सध्या कोरोनाचा देशातील फैलाव रोखण्यासाठी 24 मार्च पासून लागू असलेला लॉकडाऊन आता पाचव्या टप्प्यामध्ये आहे. 30 जून पर्यंत देशात संचारबंदीचे काही नियम लागू आहेत. प्रामुख्याने कंटेन्मेंट झोनमध्ये कडक नियम पाळले जातात. तर इतर ठिकाणी आता बर्यापैकी शिथिलता देण्यात आली आहे.
ANI Tweet
worldometers.info च्या माहितीनुसार, आता जगभरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 7,323,516 पर्यंत पोहचला आहे. तर 413,731 जणांनी आपला जीव गमावला आहे. चीनच्या वुहान प्रांतामध्ये उगमस्थान असणार्या या कोरोना व्हायरसने सार्या जगभरात थैमान घातलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच न्युझिलंडने त्यांचा देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. सध्या न्युझिलंडमध्ये एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याने सारी बंधनं हटवण्यात आली आहेत.