Coronavirus In India: भारतात कोरोनाबाधित नव्या रूग्णांच्या संख्येमध्ये सर्वात मोठी वाढ; 24 तासांत देशभरात 9304 रूग्ण आढळल्याने एकूण COVID 19 ग्रस्तांचा आकडा 2,16,919

भारतामध्ये सध्या 1,06,737 रूग्णांवर उपचार सुरू असून 1,04,107 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरामध्ये 6,075 जणांची कोरोना विरूद्धची लढाई अपयशी ठरल्याने त्यांचा दुर्देवी अंत झाला आहे.

Coronavirus In Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आज (4 जून) मागील 24 तासांत देशभरात 9304 नवे रूग्ण आढळले असून 260 जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान सध्या देशात एकूण कोरोनाबाधितांचा (Coronavirus)  आकडा 2,16,919 पर्यंत पोहचला आहे. भारतामध्ये सध्या 1,06,737 रूग्णांवर उपचार सुरू असून 1,04,107 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरामध्ये 6,075 जणांची कोरोना विरूद्धची लढाई अपयशी ठरल्याने त्यांचा दुर्देवी अंत झाला आहे. दरम्यान आज भारतामध्ये एका दिवसांत कोरोना रूग्ण आणि त्यांच्या मृत्यू होण्याच्या संख्येमध्ये झालेली ही मोठी वाढ आहे.

भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असली तरीही जगाच्या तुलनेत मृत्यूदर कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून दिली जात आहे. दरम्यान भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 74 हजारांच्या पार गेला आहे. काल रात्री महाराष्ट्रात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये 24 तासात 2500 पेक्षा नवे रूग्ण आढळले आहेत.

ANI Tweet

worldometers.info च्या माहितीनुसार, जगभरामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6,573,540 पर्यंत पोहचला आहे तर 388,041 जणांचा बळी गेला आहे. 3,170,505 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जगभर धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरसशी सारेच जग लढत आहेत. यामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणार्‍या रूग्णांच्या यादीमध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. तर अमेरिकेमध्ये अजुनही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.