Coronavirus in India: भारतात कोणत्या राज्यात किती आहे कोरोना संक्रमित रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

भारतात गेल्या 24 तासांत 4213 रुग्ण आढळले असून सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,152 वर पोहोचली आहे. यात सध्या 44,029 रुग्णांवर उपचार सुरु असून 20,917 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारत दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या विळख्यात अधिकाधिक गुरफटत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याचा अंदाज झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संक्रमितांच्या आकड्यावरुन होईल. भारतात गेल्या 24 तासांत 4213 रुग्ण आढळले असून सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 67,152 वर पोहोचली आहे. यात सध्या 44,029 रुग्णांवर उपचार सुरु असून 20,917 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्र राज्यात असून येथे 22,171 रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज दुपारी 3 वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी देशाची पुढील रुपरेषा काय असेल याबाबत चर्चा केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी 3 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा, लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता

पाहा भारतातील राज्यनिहाय कोरोना बाधितांची संख्या:

S. No. Name of State / UT Total Confirmed cases* Cured/Discharged/Migrated Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 1980 925 45
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 63 34 2
5 Bihar 696 365 6
6 Chandigarh 169 24 2
7 Chhattisgarh 59 49 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 6923 2069 73
10 Goa 7 7 0
11 Gujarat 8194 2545 493
12 Haryana 703 300 10
13 Himachal Pradesh 55 39 2
14 Jammu and Kashmir 861 383 9
15 Jharkhand 157 78 3
16 Karnataka 848 424 31
17 Kerala 512 489 4
18 Ladakh 42 21 0
19 Madhya Pradesh 3614 1676 215
20 Maharashtra 22171 4199 832
21 Manipur 2 2 0
22 Meghalaya 13 10 1
23 Mizoram 1 1 0
24 Odisha 377 68 3
25 Puducherry 9 6 0
26 Punjab 1823 166 31
27 Rajasthan 3814 2176 107
28 Tamil Nadu 7204 1959 47
29 Telengana 1196 750 30
30 Tripura 150 2 0
31 Uttarakhand 68 46 1
32 Uttar Pradesh 3467 1653 74
33 West Bengal 1939 417 185
Total number of confirmed cases in India 67152# 20917 2206
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

महाराष्ट्र पाठोपाठ गुजरातमध्ये 8194 रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर दिल्लीत 6923 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now