Coronavirus in India: देशात 147 जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांत कोविड-19 चे एकही प्रकरण नाही; 70% रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमधील

केरळमध्ये दररोज 6 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत

Medical Workers (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूविरूद्धची (Coronavirus) लढाई जिंकण्यासाठी सध्या भारतात लसीकरण चालू आहे. यासह आता लोकांना हेही माहित झाले आहे की रोज व्यवस्थित काळजी घेतली तर आपण या संसर्गापासून दूर राहू शकतो. दैनंदिन कोरोनाची प्रकरणे आता कमी होत आहेत यावरून आपण कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकत आहोत याचा अंदाज लावता येऊ शकेल. सध्या बर्‍याच दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही प्रकरण आढळले नाही. आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात असे 147 जिल्हे आहेत जिथे गेल्या 7 दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही नवीन संसर्ग नोंदवला नाही.

कोविड-19 बद्दलच्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्स (GoM) च्या 23 व्या बैठकीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, 147 जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांत कोविड-19 चे एकही प्रकरण समोर आले नाही. 18 जिल्हे असे आहेत जिथे 14 दिवसांत एकही प्रकरण आढळले नाही, तर 21 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा संसर्ग आढळला नाही. देशातील एकूण कोरोनापैकी 70% प्रकरणे महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत. आतापर्यंत देशात यूके विषाणूची एकूण 153 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सध्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 96.94 टक्के झाला आहे.

एकीकडे, देशभरात कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना, केरळ राज्यात कोविडची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, जी चिंताजनक बाब आहे. केरळमध्ये दररोज 6 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. केरळचा सकारात्मकता दर 11 टक्के आहे. केरळमध्ये मंगळवारी कोरोनाचे 6,293 नवीन रुग्ण आढळले. (हेही वाचा: पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम च देऊ शकतात कोविड 19 लसीकरणाचा अपेक्षित परिणाम; संशोधकांचा दावा)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 11,666 नवीन कोरोनाची प्रकरणे अधली आहे. 14,301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 123 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात एकूण प्रकरणे 1,07,01,193 इतकी असून, सक्रिय प्रकरणे 1,73,740 आहेत. आतापर्यंत एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,03,73,606 आहे व मृत्यूची संख्या 1,53,847 आहे. आतापर्यंत देशात एकूण 23,55,979 लसीकरण झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif