Coronavirus in India: भारत देशात कोरोना बाधितांची संख्या 12000 च्या पार; Covid 19 ने घेतला 414 नागरिकांचा बळी
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,380 झाली असून त्यापैकी 1489 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोविड 19 च्या संसर्गाने आतापर्यंत तब्बल 414 रुग्णांचा बळी घेतला आहे.
भारत देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,380 झाली असून त्यापैकी 1489 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोविड 19 च्या संसर्गाने आतापर्यंत तब्बल 414 रुग्णांचा बळी घेतला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), तामिळनाडू (TamilNadu), राजस्थान (Rajasthan) या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश (Madhya Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गुजरात (Gujarat), तेलंगणा (Telangana) या राज्यांचा नंबर आहे.
देशातील रुग्णांची वाढती संख्या पाहता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने बुधवारी तब्बल 2,74,599 सॅपल्स कलेक्ट केले. त्यापैकी 15 एप्रिल रोजी 28,941 सॅपल्स टेस्ट करण्यात आले. तसंच परिषदेने कोरोनाची चाचणी करण्यासाठी सरकारी आणि खाजगी लॅब्सची यादी जारी केली आहे. (भारतातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित; तीन विभागांत जिल्ह्यांची विभागणी)
ANI Tweet:
देशातील 170 ठिकाणं ही कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून आरोग्य मंत्रालयाकडून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे देशातील हा भाग रेड झोन मध्ये मोडत आहे. तर 207 ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने तो ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेड झोन मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.