Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 22,68,676 वर; मागील 24 तासांत 53,601 नवे रुग्ण तर 871 रुग्णांचा मृत्यू

या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 22 लाखांच्या पार गेला आहे. मागील 24 तासांत 53,601 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा आजही मोठ्या संख्येने वाढला आहे. मागील 24 तासांत 53,601 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 871 मृतांची नोंद झाली आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 22,68,676 वर पोहचली आहे. त्यापैकी 15,83,490 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 6,39,929 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान देशातील कोरोना संसर्गामुळे 45,257 मृतांची नोंद झाली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिली आहे. (महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरुच; राज्यात आज 9 हजार 181 नव्या रुग्णांची नोंद, 293 जणांचा मृत्यू)

देशात 28.21% अॅक्टीव्ह रुग्ण असून 69.80% रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृत्यूदर 1.99% इतका असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या 10 राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. तसंच या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग केंद्रीत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा अस्वस्थतेत भर टाकत असला तरी देशाचा रिकव्हरी सुधारत आहे. तर मृत्यू दर घटत आहे.

ANI Tweet:

अनलॉक 3 च्या माध्यमातून देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत अनेक सणांची लगबग आहे. त्यामुळे सणांनिमित्त गर्दी करुन नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विशेष नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे.