Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर; मागील 24 तासांत 20,903 नव्या रुग्णांची मोठी भर

मागील 24 तासांतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. 20,903 नवे रुग्ण आढळले असून 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. 20,903 नवे रुग्ण आढळले असून 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,27,439 अॅक्टीव्ह केसेस आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3,79,892 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. दरम्यान कोविड-19 ची बाधा झाल्यामुळे एकूण 18213 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे.  त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे अशा सूचना वारंवार सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान देशात अनलॉक 2 ला सुरुवात झाली असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. (महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात दिवसभरात 6 हजार 330 नव्या रुग्णांची नोंद, 125 मृत्यू)

ANI Tweet:

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना व्हायरस संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जबाबदारी अधिक आहे. दरम्यान मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून काही नवे नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आले आहेत. तर मुंबई नजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे.



संबंधित बातम्या