Coronavirus in India: मागील 24 तासांत 24,879 रुग्णांची सर्वात मोठी वाढ; भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 7,67,296 वर
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांतही 24879 रुग्णांची मोठी भर पडली असून 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
देशातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आता कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांतही 24,879 रुग्णांची मोठी भर पडली असून 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 7,67,296 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,69,789 अॅक्टीव्ह केसेस (Active Cases) आहेत. म्हणजे या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 4,76,378 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान एकूण 21,129 रुग्ण कोविड-19 संसर्गामुळे दगावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health & Family Welfare) देण्यात आली आहे.
देशातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट 61.13% इतका आहे. दरम्यान महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू येथे कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. (मुंबई, ठाणे नंतर आता कल्याण-डोंबिवली येथे COVID19 चा आकडा 10 हजारांच्या पार)
ANI Tweet:
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कालच्या दिवसात महाराष्ट्रात एकूण 6 हजार 603 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 198 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 223724 वर पोहचला आहे. त्यापैकी 123192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 91065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 9448 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे.