Coronavirus: कर्ज घेताय? तर मग RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेली Good News माहिती असायल हवीच

या वेळी त्यांनी सांगितले की, आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने 40 आधार अंक कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेपो रेट 4 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय रिव्हर्स रेपो दरही कमी करुन तो 3.35 टक्के इतका करण्यात आला आहे.

Borrowers | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे जगभरात लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला. भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे भारतासह जगभरातील अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे उलाढाल होण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. कर्ज वितरण करण्यासाठी ग्राहक कसे जमवायचे या विचाराने बँकाही हैराण आहेत. दरम्यान, अशा स्थिती तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर आरबीआय (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिलेली Good News तुम्ही जाणून घेतली पाहिजे.

RBI गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी आज पत्रकार परिषद घेत मीडिया ब्रीफिंग दिले. या वेळी त्यांनी सांगितले की, आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने 40 आधार अंक कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेपो रेट 4 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय रिव्हर्स रेपो दरही कमी करुन तो 3.35 टक्के इतका करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर कर्ज घेत असाल तर तुमच्यासाठी काही गोष्टी दिलासादाक आहेत. कारण, रेपो रेट कमी झाल्यामुळ येत्या काळात (2020-21 दुसरी सहामायी) स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत पाहून आपण कर्ज घेण्याबाबत विचार करु शकता. (हेही वाचा, RBI रेपो रेट दरात 0.04% कपात, कर्जदारांचे EMI कमी होण्याची शक्यता; गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती)

दरम्यान, य पत्रकार परिषदेत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 2020-21 मध्ये जीडीपी नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. भारतात इंधन, वीज यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कोरोना संकटामुळे सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणावर घटला आहे. त्यातच येत्या काळात डाळींच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय आहेत. त्यामुळे यंदा कृषी क्षेत्र कसे सहकार्य करते त्यावर बरेच काही अवलंबून आहे, असेही दास म्हणाले.