Coronavirus: भारतात कोरोना व्हायरसमुळे 38 जणांचा मृत्यू तर 1637 पॉझिटिव्ह रुग्ण
तसेच नागरिकांनी लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नये अशा सुचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.
भारतात कोरोन व्हायरसने थैमान घातले असून नागरिकांना वारंवार स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नये अशा सुचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही नागरिक घराबाहेर काही ना काही कारणासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. याचा पार्श्वभुमीवर देशभरात कोरोनाबाधिकांतांच्या आकड्यात वाढ झाली असून तो 1637 वर पोहचला आहे. तसेच भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 12 तासाता कोरोनाबाधितांचा आकडा 240 ने वाढला असून तो आता 1637 वर पोहचला आहे. यामध्ये 1466 कोरोनाचे संक्रमित रुग्ण, 133 रुग्णांना डिस्चार्ज आणि 38 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.तसेच दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला देशातील विविध भागातून मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शेकडोच्या संख्येने नागरिकांचा तपास करणे हे सरकारच्या समोर आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ज्या लोकांनी उपस्थिती लावली होती त्यांनी स्वत:हून पुढे यावे असे सांगण्यात आले आहे.(Coronavirus: अहमदाबादमध्ये 8 नवीन कोरोना बाधित रुग्ण; गुजरात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर पोहचली)
दरम्यान, नागरिकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील शशांक देव सुधी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शशांक देव यांनी देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना कोरोना विषाणूची चाचणी मोफत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.