Coronavirus: हॅन्ड सॅनिटायझर, मास्क मिळत नसतील तर 'या' क्रमांकावर करा तक्रार; केंद्र सरकार करणार कडक कारवाई
ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार दिवसागणिक वाढत आहे, भारतात सुद्धा या व्हायरसचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 100 हुन अधिक जणांना या संसर्गाची लागण झाली आहे, महाराष्ट्रात सुद्धा 32 जण य विळख्यात अडकले आहेत. अशावेळी इतर नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अगदी आवश्यक कामासाठी बाहेर जायचे झाल्यास मास्क (Mask) लावून बाहेर पडावे असेही वेळोवेळी सांगण्यात येते, कोणत्याही वस्तूला हात लावल्या नंतर हात सॅनिटायझरने (Sanitizer) स्वच्छ करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचना दिल्या असूनही प्रत्यक्ष बाजारात जेव्हा मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते आहे. अशावेळी नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी सरकारतर्फे एक क्रमांक जारी करण्यात आला असुन यावर नोंदवलेल्या तक्रारीचा कठोर तपास करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कुठे कराल तक्रार?
1800-11-400 या क्रमांकावर आपल्याला मास्क आणि सॅनिटायझर मिळत नसल्याची तक्रार नोंदवता येणार आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे. कोरोनाने उद्भवलेल्या संकटसमयी या आवश्यक वस्तूंचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस बाधितांना मिळणार विम्याचे कवच; COVID 19 वरील उपचारांसाठी आयआरडीआयए कडून ग्वाही
प्राप्त माहितीनुसार, मास्क आणि सॅनिटायझरचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यामध्ये सर्जिकल मास्क, एन 95 मास्क यांचा समावेश होतो. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी हा निर्णय घेतला आहे असेही केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, मागील काही काळात भेसळयुक्त हँडवॉश, सॅनिटायझर वापरण्यात आल्याची तसेच किमतीपेक्षा अधिकभाव आकारून मास्क विकली जाण्याचे अनेक प्रसंग समोर आले होते या साऱ्यावर सुद्धा या मागातून रोख बसेल असा केंद्र सरकारचा विश्वास आहे.