Coronavirus: गेल्या 24 तासात 386 नव्या रुग्णांची नोंद, देशातील कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 1637: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

कोणत्याही परिस्थिती नागरिकांनी गर्दी टाळायला हवी. तसेच, धार्मिक कार्यक्रमही मोठ्या कटाक्षाने टाळायला हवेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट देशात अधिकच गहिरे होत चालल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Union Health Ministry) सचिव लव अगरवाल (Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 24 तासात 386 नव्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही आता 1637 इतकी झाली आहे. देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही अगरवाल यांनी या वेळी सांगितले.

या वेळी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, लॉकडाऊन काळात नागरिकांनी जागरुकता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थिती नागरिकांनी गर्दी टाळायला हवी. तसेच, धार्मिक कार्यक्रमही मोठ्या कटाक्षाने टाळायला हवेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या वेळी सांगितले की,  देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 132 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तबलीग जमात येथून परतलेल्या नागरिकांना ट्रॅक करण्यात येत आहे.  त्यातील 1800 लोकांना 9 रुग्णालयांमध्ये दाखल करुन अलगिकरण कक्षात ठेवले आहे, असेही आरोग्य मंंत्रालयाने या वेळी सांगितले. (हेही वाचा, Coronavirus: भारतात कोरोना व्हायरसमुळे 38 जणांचा मृत्यू तर 1637 पॉझिटिव्ह रुग्ण)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

देशातील नागरिकांनी राज्याराज्यांमधे केले जाणारे स्थलांतरण टाळावे. देशातील विविध राज्यांतील नागरिक वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलेले असतात. त्यांनी आपापल्या राज्यात परतण्याची आवश्यकता नाही. संबंधित राज्यांनी त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सींग पाळण्याच्या निर्णयाला बाधा येईल असे काहीही करु नका असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif