Coronavirus: देशातील 77% कोरोना रुग्ण केवळ 10 राज्यांमध्ये; महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ अव्वल, 25 शहरांमध्ये COVID 19 संक्रमितांच्या मृत्युचे प्रमाण तब्बल 48%
तसेच नव्या रुग्णांपेक्षाही कोरना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरना व्हायरस संक्रमितांशी संबंधीत 48% मृत्यू देशातील 25 जिल्ह्यांमध्ये अधिक आहेत. यात महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.
देशातील एकूण कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या एकूण आकडेवारीपैकी 77% रुग्ण हे अवघ्या 10 राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तमिलनाडू (Tamilnadu), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan, Secretary, Union Health Ministry) यांनी ही माहिती मंगळवारी दिली. राजेश भूषण यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10 लाखांहून कमी राहिली आहे. देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यास्थितीत कोरना रुग्णांचा रिकव्हरी रेट 84 टक्के इतका आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले की, कोविड-19 (Covid-19) रुग्णांचा प्रतिदिन सरासरी दर कमी झाला आहे. तसेच नव्या रुग्णांपेक्षाही कोरना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरना व्हायरस संक्रमितांशी संबंधीत 48% मृत्यू देशातील 25 जिल्ह्यांमध्ये अधिक आहेत. यात महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. (हेही वाचा, Coronavirus: नोटांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का? आरबीआयने दिली 'अशी' माहिती)
कोरोना व्हायरस संक्रमन रोखण्यासाठी आम्ही सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या संपर्कात आहोत. देशाचा एकूण मृत्यूदर हा 1% इतका आहे, असे सांगतानाच राजेश भूषण यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रातल कोविड 19 रुग्णांबाबत लगेचच काही सांगणे अतिघाईचे ठरेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात, अथवा स्थिर पातळीवर आले आहे किंवा नाही हे कळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल असेही, राजेश भूषण म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 14,53,653 इतकी झाली आहे. त्यापैकी 11,62,585 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. प्रत्यक्षात 252277 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 38147 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांबाबत बोलायचे तर आतापर्यंत देशातील एकूण रुग्णसंख्या 66,23,816 इतकी झाली आहे. यापैकी 55,86,704 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 10,2685 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 934427 इतकी आहे.