Coronavirus: हवाईदलाचे हेलीकॉप्टर एक्सप्रेसवेवर लँड

हिंडन पासून सुमारे 3 नॉटिकल माईल्स अंतरावर हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यानंतर हे हेलिकॉप्टर राज्य महामार्गावर लँड करण्यात आले.

Helicopter Cheetah (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बागपत येथे हवाईदलाचे एक हेलिकॉप्टर (IAF Chopper) एक्सप्रेसवेवर लँड करण्यात आले. ही घटना गुरुवारी (16 एप्रिल 2020) सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर केविड 19 (COVID 19 नमुने घेऊन निघाले होते. दरम्यान, या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडींग (Emergency Landing) करण्यात आले. हवाईदलानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशातील कोरोना व्हायरस विरुद्धच्या संकटाचा सामना करण्यासाठी वायुदलाची मदत घेतली जात आहे.

हवाईदलाने एक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोविड 19 संदर्भात कर्तव्यावर असलेले चीता हेलिकॉप्टर लेह येथून चाचणी नमूने घेऊन हिंडन मार्गे चंडीगढ दिशेने निघाले होते. हिंडन पासून सुमारे 3 नॉटिकल माईल्स अंतरावर हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यानंतर हे हेलिकॉप्टर राज्य महामार्गावर लँड करण्यात आले. (हेही वाचा, Coronavirus 'हॉट-स्पॉट' परिसरात नजर ठेवणारे 'ड्रोन' बेपत्ता; पोलीसांची धावपळ)

वायुसेनेने आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित अधवा वित्त हानी झाली नाही. पायलटने ऐनवेळी घेतलेला निर्णय योग्य होता. हा निर्णय घेताच पायलटने त्याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि हिंडन येथील कार्यालयाला दिली. त्यानंतर हिंडन येथून एक हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. तेही एक्सप्रेसवेवर लँड करण्यात आले. दरम्यान इमरजन्सी लँड करण्यात आलेले हेलिकॉप्टरही तांत्रिक बिघाड दूर करुन पर हिंडन येथे आणण्यात आले, असेही वायूदलाने म्हटले आहे.