कोरोना व्हायरस पासून बचावासाठी काय तयारी करावी सांगणारा सिंगापूरच्या पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांना सल्ला

देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) 5 रुग्ण आढळल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व सरकारने काय देशवासियांसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा सल्ला खुद्द राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून सिंगापूरच्या पंतप्रधानांचा एक व्हिडीओ शेअर करत अशा प्रकारे कोरोना पासून वाचता येईल असे लिहिले आहे

Congress President Rahul Gandhi | File Image | (Photo Credits: IANS)

देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) 5  रुग्ण आढळल्यावर आता हे संकट भारतात जोर धरणार असल्याची चिन्हे आहेत, अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व सरकारने काय देशवासियांसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा सल्ला खुद्द राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून सिंगापूरच्या पंतप्रधानांचा एक व्हिडीओ शेअर करत अशा प्रकारे कोरोना पासून वाचता येईल असे लिहिले आहे. या व्हिडीओ मध्ये सिंगापूर देशाने कोरोना व्हायरस पसरू न देण्यासाठी घेतलेल्या खबरदारी सांगितल्या गेल्या आहेत अशीच अंमलबजावणी भारतात सुद्धा करावी असा साला राहुल यांनी मोदींना दिला आहे. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak: जगभरात COVID-19 ने घेतले 3000 बळी; 88,000 जणांना लागण

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये पंतप्रधान Lee Hsien Loong हे आपल्या देशाने तयार केलेली स्ट्रॅटर्जी सांगत आहेत, देशात या व्हायरस वर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर आहेत, आवश्यक तितका औषध पुरवठा आहे, व्हायरस पसरू नये म्हणून मास्क चा साठा करून ठेवण्यात आला आहे, कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात इतरांनी येऊ नये याची काळजी घेतली जातेय, असे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. अशा काही टिप्स भारतात सुद्धा अंमलात आणाव्यात असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला आहे.

राहुल गांधी ट्विट

दरम्यान, हा सल्ला देताना मोदींना टोला लागवण्याची संधी सुद्धा राहुल गांधी यांनी पूरती हेरली आहे. राष्ट्रावर एवढे मोठे संकट असताना सोशल मीडियाचा चाललेला खेळ थांबवा असे आवाहन सुद्धा राहुल यांनी ट्विट मधून केले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी एका ट्विट मधून सरकार कोरोनाच्या भीतेला गंभीररीत्या विचारात घेत नाहीये असे म्हणत नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले होते, देशावर आलेल्या संकटात एककेंद्रित पणे काम करणे हे चहल्या नेत्याची कर्तव्य आहे आणि तसे केले जावे असेही राहुल यांनी आपल्या ट्विट मधून सुनावले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now