Conspiracy To Overturn Train: पाटणा-गया रेल्वे मार्गावर ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर ठेवला मोठा दगड; थोडक्यात वाचले इस्लामपूर-हटिया एक्सप्रेसमधील प्रवाशांचे प्राण

जीआरपी स्टेशन प्रभारी दीपनारायण यादव यांनी सांगितले की, काही असामाजिक घटकांनी ट्रॅकवर दगड ठेवला होता.

Conspiracy To Overturn Train प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - @ndtvindia)

Conspiracy To Overturn Train: बिहार (Bihar) मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणा-गया रेल्वे सेक्शन (Patna-Gaya Railway Station) वर मंगळवारी रात्री उशिरा मखदुमपूर आणि बेला स्थानकांदरम्यान नियामतपूर थांब्याजवळ रुळावर मोठा दगड टाकून इस्लामपूर-हटिया एक्स्प्रेस ट्रेन उलटवण्याचा कट (Conspiracy To Overturn Train) आखण्यात आला होता. ट्रेनच्या लोको पायलटने वेळीच दगड पाहिला आणि आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेनला अपघात होण्यापासून वाचवले. जीआरपी स्टेशन प्रभारी दीपनारायण यादव यांनी सांगितले की, काही असामाजिक घटकांनी ट्रॅकवर दगड ठेवला होता.

इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतर इस्लामपूर-हटिया एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने जीआरपी पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रुळावरील दगड हटवले आणि गाडी पुढे रवाना केली. यामुळे ट्रेन 20 मिनिटे थांबली. आता जीआरपीने अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच पोलिस सध्या रुळांवर दगड टाकणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात व्यस्त आहे. (हेही वाचा -Conspiracy To Bomb Army Train: मध्य प्रदेशात आर्मी स्पेशल ट्रेन उडवण्याचा प्रयत्न फसला; रेल्वे रुळांवर सापडले 10 डिटोनेटर)

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही ट्रेन उलटवण्याचा कट -

बुधवारी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये गाड्या उलटवण्याचा मोठा कट उघडकीस आला होता. ग्वाल्हेरमधील बिर्ला नगर स्थानकाजवळ तिसऱ्या लाईनच्या रुळांवर तारांना बांधलेले जाड लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते. लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मालगाडीला आपत्कालीन ब्रेक लावून अपघात टळला. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

ग्वाल्हेरमधील बिर्ला नगर स्थानकाबाहेर रुळांवर जाड लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते. झाशी-भोपाळ रेल्वे मार्गावरील ट्रेन उलटवण्याचा कटही रचण्यात आला होता. अशा प्रकारच्या घटना यूपीमध्ये अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत.