IPL Auction 2025 Live

Rajiv Gandhi 75th Birth Anniversary: राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आठवडाभर दिला जाणार त्यांच्या आठवणींना उजाळा

त्याचं औचित्य साधून राहुल गांधी यंदा राजीव गांधी आठवडा साजरा करणार आहेत. प्रत्येक दिवशी त्यासाठी एक खास गोष्ट शेअर करणार आहे.

Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

कॉंग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची यंदा 75 वी जयंती साजरी करणार आहे. यंदा 20 ऑगस्ट दिवशी राजीव गांधी यांचा 75 वा वाढदिवस आहे.त्यांच्या अनुषंगाने आता कॉंग्रेस पार्टीने खास प्लॅनचं आयोजन केलं आहे. त्याचं औचित्य साधून राहुल गांधी यंदा राजीव गांधी आठवडा साजरा करणार आहेत. प्रत्येक दिवशी त्यासाठी एक खास गोष्ट शेअर करणार आहे. राजीव गांधी यांच्या योगदानामुळे, दूरदृष्टीमुळे आज भारतामध्ये Information Technology revolution पाहता येत आहे.भारतामध्ये टेलिकॉमच्या क्रांती मध्ये राजीव गांधींच्या धोरणांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांचे या कार्यातील योगदान पाहता या विषयाशी निगडीत नियमित एक गोष्ट शेअर केली जाणार असल्याचं ट्विट राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केलं आहे.

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 दिवशी झाला. लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या राजीव गांधींनी सुरूवातीला पायलटचे शिक्षण घेतले होते मात्र पुढे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्यावर भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पडली. मात्र दुदैवाने 1991 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या करण्यात आली.

Rahul Gandhi Tweet

राजीव गांधींच्या पश्चात आता त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी आणि लेक प्रियंका गांधी राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आहेत. राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून हरमू मैदान ते सद्भावना यात्रा याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.