LPG Price Hike: गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात उद्या काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; महिला कार्यकर्त्यांचा इशारा

विनाअनुदानीत घरगुती गॅस (Non- Subsidized Gas Cylinder) सिलेंडरच्या किमतीत आज सरकारकडून जवळपास 145 रुपयांची वाढ करण्यात आली, याच अवाजवी दरवाढीच्या विरुद्ध उद्या काँग्रेस (Congress) तर्फे देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे.

Gas Cylinder Price Hike Protest (Photo Credits: File Image, Pixabay)

विनाअनुदानीत घरगुती गॅस (Non- Subsidized Gas Cylinder) सिलेंडरच्या किमतीत आज सरकारकडून जवळपास 145 रुपयांची वाढ करण्यात आली, आजपासूनच हे नवे दर मुंबई (Mumbai) , चेन्नई (Chennai) , कोलकाता (Kolkata)  सह देशभरातील महानगरात लागू करण्यात आले आहेत. वाढलेल्या किमती या जवळपास 850 च्या घरात जाणाऱ्या असल्याने यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच छाप बसणार असल्याचे देखील समजतेय, याच अवाजवी दरवाढीच्या विरुद्ध उद्या काँग्रेस (Congress) तर्फे देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दरवाढीला विरोध करत बंद पुकारणार असल्याची भूमिका घेतली आहे. LPG Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या विना अनुदानित किंमतीत मोठी वाढ; आज पासून मुंबई, दिल्ली, कोलकता येथे लागु झालेले नवे दर जाणुन घ्या

सद्य घडीला सरकारतर्फे सर्व नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर साठी अनुदान देण्यात येते, यामध्ये 12 सिलेंडरसाठी अनुदान मिळवता येते मात्र त्याहून अधिक सिलेंडर लागल्यास त्यासाठी अधिक किंमत भरून खरेदी करण्याची सोय आहे. आजपासून लागू क्लरण्यात आलेली दरवाढ ही सुद्धा या विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत लागू करण्यात आली आहे, मात्र त्यासाठी सुद्धा एकाएकी पूर्वसूचना न देता इतकी मोठी वाढ करणे हे योग्य नाही असे म्हणत काँग्रेसतर्फे संपाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील महिन्यात म्हणजेच 1  जानेवारी 2020 रोजी अशाच प्रकारे विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत दरवाढ करण्यात आली होती. मात्र त्यावेळेस 21 ते 22  रुपये इतकेच भाव वाढवले होते. आजपासून थेट 145 रुपयाची वाढ केल्याने हा वाद सुरु झाला आहे. यावर अद्याप सरकारच्या वतीने काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.