Cleanest Cities of India: सातारा जिल्ह्यातील पाचगणी व कराड ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहरे; 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये Indore ने मारली बाजी
छत्तीसगडच्या पाटणला दुसरे स्थान मिळाले आहे तर, महाराष्ट्रातील कराड शहर तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील स्वच्छ शहरांची (Cleanest Cities of India) क्रमवारी 1 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यंदाची इंदूरला स्वच्छ शहरांच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. अशाप्रकारे मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर सलग सहाव्यांदा स्वच्च शहर ठरले आहे. दुसरीकडे मोठ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशला पहिले स्थान देण्यात आले आहे. छोट्या राज्यांमध्ये त्रिपुरा पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरु यांनी शनिवारी 2022 च्या स्वच्छतेच्या मापदंडांवर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची (ULB) क्रमवारी जाहीर केली. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंदूर मॉडेल देशभरात लागू करण्याच्या गरजेवर भर दिला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, इंदूरने जे लोकसहभागाचे मॉडेल स्वीकारले आहे ते सर्व शहरांनी स्वीकारले पाहिजे. इंदूर मॉडेल देशभरात लागू करण्याची गरज आहे. इंदूरने एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये बाजी मारली आहे. सुरत दुसऱ्या स्थानी तर, नवी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर विशाखापट्टणम, विजयवाडा, भोपाळ, तिरुपती, म्हैसूर, एनडीएमसी, अंबिकापूर यांचा नंबर लागतो. (हेही वाचा: सलग 7 व्या महिन्यात GST Collection 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे, अर्थ मंत्रालयाची माहिती)
महत्वाचे म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचगणीला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. छत्तीसगडच्या पाटणला दुसरे स्थान मिळाले आहे तर, महाराष्ट्रातील कराड शहर तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यानंतर लोणावळा आणि कर्जत यांना स्थान देण्यात आले आहे. पाचगणी आणि कराड ही दोन्ही शहरे सातारा जिल्ह्यात आहेत. देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये, महाराष्ट्रातील देवळाली सर्वात स्वच्छ म्हणून उदयास आले आणि त्यानंतर मध्य प्रदेशातील अहमदाबाद आणि महू यांचा क्रमांक लागतो. दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड या यादीत पाचव्या स्थानावर आहे.