CIDCO Lottery 2026: खारघर, तळोजा आणि कळंबोली येथील EWS घरांसाठी cidcohomes.com वर कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या पात्रता व नियम

सिडकोच्या खारघर, तळोजा आणि कळंबोली येथील महागृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) सदनिकांसाठी उत्पन्न मर्यादा, वयाची अट आणि आवश्यक पात्रतेचे सर्व नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.

Photo Credit- X

CIDCO Lottery 2026 on cidcohomes.com:  सिडकोतर्फे (CIDCO) नवी मुंबईतील खारघर, तळोजा आणि कळंबोली या परिसरामध्ये राबवल्या जाणाऱ्या महागृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) [PMAY(U)] अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) सदनिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना राज्य आणि केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या विशिष्ट पात्रता अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल ६,००,००० रुपये (सहा लाख रुपये) पर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये पती आणि पत्नी दोघांचेही उत्पन्न ग्राह्य धरले जाते. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त असल्यास अर्जदार या प्रवर्गात अर्ज करण्यास अपात्र ठरतो.

वयाची अट आणि राष्ट्रीयत्व

अर्ज सादर करण्याच्या तारखेला अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही. तसेच अर्जदार हा भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.

भारतात पक्के घर नसणे बंधनकारक

योजनेच्या नियमांनुसार, अर्जदार, त्याचा/तिचा पती किंवा पत्नी तसेच अविवाहित मुले यांच्या नावावर संपूर्ण भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे. तथापि, कुटुंबातील कमावत्या प्रौढ सदस्याला (त्याची वैवाहिक स्थिती विचारात न घेता) स्वतंत्र कुटुंब मानले जाऊ शकते, जर त्याच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसेल.

महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला

अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सलग वास्तव्य असणे अनिवार्य आहे. यासाठी सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अधिकृत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करावे लागते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement