चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर, H3N8 बर्डफ्लूमुळे पहिल्यांदाच माणसाने गमावला जीव

एका बाजारात ती गेली होती. त्या बाजारातून गोळा केलेल्या नमुन्यात H3 एवियन इन्फ्लूएंझा व्हायरस आढळून आले तर घरी घेतलेले नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती डब्लूएचओकडून देण्यात आली आहे.

Virus Repetitional Photo (PC - Pixabay)

चीनमध्ये आणखी एका व्हायरसने (Virus) कहर सुरु केल्यामुळे संपुर्ण जगाच्या नजरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे लागल्या आहेत. H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या (Bird Flu) व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील एका 56 वर्षीय महिलेला  H3N8 बर्ड फ्लूची लागण झाली होती. सोमवारी या महिलेच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, H3N8 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

या महिलेला निमोनियाझाल्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्या महिलेला मायलोमा (कॅन्सर) सह अनेक आरोग्यविषयक समस्या होत्या.  WHO ने आपल्या अपडेटमध्ये सिव्हियर एक्युच रेस्पिरेटरी इन्फेक्शन (SARI) प्रणालीद्वारे केस शोधण्यात आले. रुग्णाच्या जवळच्या संपर्कापैकी कोणालाही संसर्ग किंवा रोगाची लक्षणे आढळली नाहीत.

सदर महिला ही प्राण्याच्या संपर्कात आली होती. एका बाजारात ती गेली होती. त्या बाजारातून गोळा केलेल्या नमुन्यात H3 एवियन इन्फ्लूएंझा व्हायरस आढळून आले तर घरी घेतलेले नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती डब्लूएचओकडून देण्यात आली आहे. H3N8 फ्लूचा व्हायरस सामान्यत: पक्ष्यांमध्ये आढळतो. पंरतु तो घोड्यांमध्येही आढळतो आणि डॉग फ्लू होण्यास सक्षम असलेल्या दोन व्हायरस पैकी एक आहे.  चीनमध्ये नोंदवलेले नवीन प्रकरण हे मानवांमध्ये संसर्गाचे फक्त तिसरे प्रकरण आहे आणि प्रौढ व्यक्तीला संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण आहे. या व्हायरसमुळे पहिल्यांदा एखाद्याचा मृत्यू झाला आहे.