Chennai Man Becomes a Millionaire: मित्राला Rs 2,000 पाठवताच खात्यावर 753 कोटी रुपये जमा ; चेन्नईतील व्यक्ती दणक्यात करोडपती, घ्या जाणून

चेन्नई येथील एक व्यक्ती काही तासांसाठी त्याच्याही नकळत करोडपती बनला आहे. घडले असे की, एका मित्राने त्याला 2000 रुपये उसणे मागितले त्याने ते पाठवले आणि नंतर बँक खात्यावरील शिल्लख तपासली. पाहतो तर काय? तो चक्क करोडपती झाला होता. त्याच्या बँक खात्यावर तब्बल 753 रुपये दिसत होते.

Money. Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Common Man Millionaire News: काहीही न करता तुमच्या बँक खात्यावर जर कोट्यवधी रुपये आले तर? जगभरातील असंख्य लोक अशा प्रकारे स्वप्नरंजनात रमत असतील. प्रत्यक्षात असे घडत नसते हेही खरे. पण, मजेशीर असे की, खरोखरच असे घडले आहे. होय, चेन्नई येथील एक व्यक्ती काही तासांसाठी त्याच्याही नकळत करोडपती बनला आहे. घडले असे की, एका मित्राने त्याला 2000 रुपये उसणे मागितले त्याने ते पाठवले आणि नंतर बँक खात्यावरील शिल्लख तपासली. पाहतो तर काय? तो चक्क करोडपती झाला होता. त्याच्या बँक खात्यावर तब्बल 753 रुपये दिसत होते. जे पाहून त्याला आश्चर्य वाटले नसते तरच नवल. खात्यावरील रक्कम पाहून हादरुन गेलेल्या त्या इसमाने मग ताततीने आपल्या बँक व्यवस्थापनाशी संपर्क केला आणि नेमके काय घडले आये याची पडताळणी केली.

खातेदाराकडून आलेल्या तक्रारीनंतर बँकेने तातडीने पावले टाकली आणि सदर खातेदाराच्या खात्यावरील रक्कम फ्रीज केली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. एक फार्मसी कंपनीचा कर्मचारी. त्याच्या खात्यावर इतकी रक्कम आलीच कशी? याबात पोलीसही चक्रावले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, घडल्या प्रकारामुळे हा फार्मसी कर्मचारी चांगलाच चर्चेत आला आहे. (हेही वाचा, Ahmedabad: अहमदाबादचा माणूस काही तासांसाठी झाला 'करोडपती', चुकून डिमॅट खात्यात आले 11 हजार कोटी रुपये)

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फार्मसी कर्मचारी मुहम्मद इदरीस याने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) आपल्या कोटक महिंद्रा बँक (Kotak Manhidra Bank) खात्यावरुन मित्राला 2,000 ट्रान्सफर केले. व्यवहार पूर्ण केल्यावर खात्यावरचे शिल्लख बघण्यासाठी त्याने खाते तपासले तर त्यावर तब्बल 753 कोटी रुपये त्याला आढळून आले. त्याने पुन्हा पुन्हा खाते तपासले तर त्यावरची रक्कम कायम होती. जी प्रचंड मोठी होती. त्यानंतर त्याने तातडीने बँक व्यपस्थापणासी संपर्क केला. बँकेने त्याचे खाते गोठवले.

दरम्यान, अशा घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशाअनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये पाहायला मिळाले आहे की, लोकांच्या खात्यावरील शिल्लख अचानक वाढली आहे. तामिळनाडूमध्ये नुकतीच अशीच एक घटना पुढे आली होती. ज्यामध्ये पाहायला मिळाले की, एका कॅब चालकाच्या बँक खात्यावर तब्बल 9,000 कोटी रुपयांची रक्कम वळती झालेली आढळून आली. त्याने बँकेशी संपर्क केला असता आढळून आले की, काही तांत्रिक कारणामुळे त्याच्या बँक खात्यावर तेवढी रक्कम दिसत होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now