बदलत आहेत बँक, रेस्ते आणि टेलिकॉम क्षेत्रातील नियम; Fastag, NEFT व Portability संदर्भात घ्या जाणून

त्याचसोबत सरकारकडून 2.5 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. फास्टॅग बसवण्याची आधीची मुदत 1 डिसेंबर होती, मात्र आता केंद्र सरकारने वाहन चालकांना दिलासा देत ही मुदत वाढवून 15 डिसेंबर केली आहे.

Toll Plaza (Image: PTI)

येत्या दोन दिवसांत केंद्र सरकारकडून तीन नवीन लागू होणार आहेत. बँक, रेस्ते आणि टेलिकॉम क्षेत्रातील हे नियम आहे. 14 डिसेंबर मध्यरात्रीपासून फास्टॅग (Fastag) ची यंत्रणा लागू होईल. तर 16 डिसेंबर, सोमवारपासून NEFT ची सुविधा 24 तास उपलब्ध होणार आहे. याच दिवसांपासून ट्राईचे नियम अंमलात येतील. याआधी सरकारने फास्टॅगची मुदत वाढवली होती, मात्र आता ही मुदत वाढवली नाही तर देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅग लागू होईल.

डिजिटल पेमेंटला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने फास्टॅगची सुविधा जरी करण्याचा विचार केला आहे. याद्वारे तुम्हाला टोल नाक्यावर रोख पैसे देण्याची गरज नाही. टोलचे पैसे तुमच्या बँकखात्यातून वळीत केले जाणार आहेत.  याशिवाय, आपण फास्टॅग लेनमध्ये वाहन नेल्यास दुहेरी टोल आकारला जाईल. 16 डिसेंबरपासून ट्रायच्या नियमांत बदल होणार आहेत, ज्याद्वारे ग्राहक अवघ्या तीन वर्किंग दिवसांत नंबर पोर्ट करू शकतील. (हेही वाचा: Fastag 'या' ठिकाणी दिला जात आहे फ्री, आजच घ्या नाहीतर दुप्पट टोल भरावा लागेल)

बँकांच्या नियमांमध्येही सोमवारपासून बदल होत आहेत. आता 16 डिसेंबर पासून बँका 24 तास NEFT करू शकतील, म्हणजेच कधीही पैसे ऑनलाइन पाठविण्याची किंवा घेण्याची सुविधा असेल. ही सुविधा 15 डिसेंबर रात्री साडेबारा वाजल्यापासून लागू होईल. दरम्यान अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना सुरुवातीच्या महिन्यांसाठी फास्टॅग फ्री करण्यात आला आहे. त्याचसोबत सरकारकडून 2.5 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. फास्टॅग बसवण्याची आधीची मुदत 1 डिसेंबर होती, मात्र आता केंद्र सरकारने वाहन चालकांना दिलासा देत ही मुदत वाढवून 15 डिसेंबर केली आहे.