Champai Soren To Launch New Political Party: झारखंडच्या राजकारणात भूकंप; Hemant Soren यांच्याशी बंडखोरी केल्यानंतर चंपाई सोरेन स्थापन करणार नवीन पक्ष

मात्र काम करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत.'

Champai Soren (PC - Facebook)

Champai Soren To Launch New Political Party: झारखंडच्या (Jharkhand) राजकारणात भूकंप झाला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Ex CM Champai Soren) यांनी अखेर बंडखोरी केली आहे. कोल्हन टायगर या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंपाई यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळे यावेळची झारखंड विधानसभा निवडणूक झारखंड मुक्ती मोर्चासाठी सोपी जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डिसेंबरअखेर राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ही लढत तिरंगी झाली आहे. अशात चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. चंपाई सोरेन यांनी सांगितले की, जर त्यांना वाटेत कोणी मित्र भेटला तर ते त्यांच्याशी हस्तांदोलन करतील.

हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर चंपाई मुख्यमंत्री झाले आणि 3 जुलैपर्यंत ते झारखंडचे मुख्यमंत्री राहिले. ते शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या जवळचे मानले जात होते. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यांच्या राजीनाम्यानंतर काही दिवसांनी त्यांची नाराजी समोर आली. आता चंपाई यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याचे नाव आणि चिन्ह काय असेल ते येत्या काही दिवसांत कळेल.

चंपाई सोरेन यांचे निवेदन- 

मी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. सर्व जाती आणि समाजाच्या लोकांसाठी आम्ही अनेक प्रकारच्या योजना आणल्या. मी कमी कालावधीत जेवढे काम करू शकलो त्याबाबत मी समाधानी आहे.’ (हेही वाचा: Egg Puff Scandal: आंध्रच्या सीएमओने दररोज खाल्ले तब्बल 993 एग पफ? Jagan Mohan Reddy यांनी पाच वर्षांत नाश्त्यावर 3.62 कोटी खर्च केल्याचा TDP चा आरोप)

आता चंपाई म्हणाले, यापूर्वी मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता, मात्र आता जनतेच्या सेवेसाठी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर चांगला मित्र मिळाल्यास आम्ही त्याला सोबत घेऊन आमची मोहीम पुढे नेऊ. आमच्याकडे 30 ते 40 हजार कार्यकर्ते आहेत, अशा परिस्थितीत आम्ही नवीन संघटना स्थापन करत आहोत. दरम्यान, चंपाई सोरेन हे झारखंडच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. 1990 च्या दशकात त्यांनी वेगळ्या राज्याच्या लढ्यात भाग घेतला होता. त्यांच्या योगदानासाठी त्यांना 'टायगर ऑफ झारखंड' असे नाव देण्यात आले.