Independence Day 2021: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन साठी 360-degree VR चं फीचर सह indianidc2021.mod.gov.in नवी वेबसाईट लॉन्च
नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरीलसेलिब्रेशन देखील पहिल्यांदाच Virtual Reality (VR) Feature द्वारे पाहण्याची सोय आहे. 360 अंशात हे सेलिब्रेशन पाहता येईल.
यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वर्ष (75th Independence Day 2021 Celebrations) साजरी करत आहे. या सेलिब्रेशन साठी सरकारी पातळीवर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये आता एका नव्या वेबसाईटचं देखील लॉन्च करण्यात आलं आहे. indianidc2021.mod.gov.in ही वेबसाईट आहे. Defence Secretary Dr Ajay Kumar यांच्याकडून 3 ऑगस्टला Independence Day 2021 Celebrations साठी ही विशेष वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून जगाभरातील भारतीय एकत्र येऊन राष्ट्रीय दिवस साजरा करू शकणार आहेत. लवकरच Independence Day Celebrations (IDC), 2021 अॅप देखील जारी केले जाणार आहे. नक्की वाचा: Independence Day 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त, वाचा नेमकं कसं आहे आयोजन.
नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरीलसेलिब्रेशन देखील पहिल्यांदाच Virtual Reality (VR) Feature द्वारे पाहण्याची सोय आहे. 360 अंशात हे सेलिब्रेशन पाहता येईल. VR gadget नसले तरीही लोकांना हे फीचर वापरता येणार आहे.
Independence Day Celebration Platform ची इतर वैशिष्ट्यं
स्पेशल आयडीसी रेडिओ,
गॅलरी
इंटरअॅक्टिव्ह फिल्टर्स,
शहिदांवरील ई बूक्स
1971 विजयाची 50 वर्ष
स्वातंत्र्य चळवळीवर ब्लॉग्स,
राष्ट्रीय स्मारक
लॉगिन ईन केल्यानंतर प्रत्येक मिनिटांची माहिती
पार्किंग डिटेल्स,
रूट मॅप
Independence Day platform मध्ये web-based RSVP system चा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक invitation card साठी क्यू आर कोड बनवला जाईल. आमंत्रित व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करून कोड स्कॅन करू शकतो. यानंतर एक वेब लिंक तयार केली जाईल आणि वेब पोर्टल मध्ये पुढे प्रवेश दिला जाईल. जर कोणाला कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर ते देखील या पोर्टल द्वारा त्यांची इच्छा व्यक्त करू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)