Pollachi Sex Scandal: 50 पेक्षाही अधिक मुलींचे अश्लिल व्हिडिओ; CBI कडून तपास सुरु
१२ फेब्रुवारी २०१९ रोजी कोईमतूर जिल्ह्यात पोलाची जवळ एका कारमध्ये चार युवकांनी एका तरुणीचे कथित रुपात लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचा व्हिडिओ बनवून हे लोक तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होते. त्यातच पीडितेचा व्हिडिओही लीक झाला. ज्यात तीचा आरडाओरडा आणि नराधमांना केलेला विरोधही स्पष्ट दिसत होता. या व्हिडिओनंतर प्रकरणाला वाचा फुटली आणि एक भयानक सेक्स स्कँडल समोर आले.
Pollachi sexual harassment case: तामिळनाडू (Tamil Nadu) आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या पोलाची सेक्स स्कँडल (Pollachi Sex Scandal) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) द्वारा तपास सुरु केला आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे. लैंगिक शोषणासंदर्भात असलेल्या या हायप्रोफाईल प्रकरणाने तामिळनाडूत जोरदार खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील गुंतागूंत आणि व्याप्ती ध्यानात घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
अम्मा मक्काल मुनेत्र कळघम (AMMK) सरचिटणीस TTV दिनाकरन यांनी पोलाची सेक्स स्कँडल प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या विलंबाबात गुरुवारी टीका केली होती. ही टीका करताना दिनाकरन यांनी म्हटले होते की, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याच्या गोष्टीला आता ४० दिवस उलटून गेले. तरीही या प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी २०१९ रोजी कोईमतूर जिल्ह्यात पोलाची जवळ एका कारमध्ये चार युवकांनी एका तरुणीचे कथित रुपात लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचा व्हिडिओ बनवून हे लोक तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होते. त्यातच पीडितेचा व्हिडिओही लीक झाला. ज्यात तीचा आरडाओरडा आणि नराधमांना केलेला विरोधही स्पष्ट दिसत होता. या व्हिडिओनंतर प्रकरणाला वाचा फुटली आणि एक भयानक सेक्स स्कँडल समोर आले. (हेही वाचा, बेळगाव: कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी बायकोवर दबाव; विकृत नवऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे आगोदर महिलांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत. त्यानंतर जाळ्यात सापडलेल्या महिला, मुलींचा विश्वास संपादन करत. त्यानंतर संबंधित महिलेला ते विशिष्ठ ठिकाणी बोलवत त्यानंतर ते तिचे लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवत असत. त्यानंतर बनवलेल्या सेक्स व्हिडिओच्या माध्यमातून ते तिला पैशासाठी तगादा लावत. पैसै दिले नाहीत तर व्हिडिओ लिक करण्याची धमकी देत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)