Income Tax विभागाची करदात्यांना शेवटची संधी! 21 दिवसांत Income Tax Return फाईल करा अन्यथा कारवाईला सामोरी जा
अन्यथा तुम्हांला Income-tax Act, 1961 च्या अंतर्गत कारवाईला सामोरं जाणं भाग आहे.
2017-18 या वर्षामध्ये तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (Tax Returns) भरायचा राहिला असेल तर तुम्हांला शेवटच्या 21 दिवसांची मुदत आयकर विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून नॉन फाईलर्स मॉनिटरिंग (Non-filers Monitoring System) सिस्टीमचा वापर करून रिटर्न न भरणार्यांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये मोठ्या रक्कमेचा आर्थिक व्यवहार (High-Value transactions in 2017-18) केला आहे मात्र रिटर्न भरलेला नाही अशा लोकांना 21 दिवसांच्या त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. अन्यथा कारवाईची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी या आहेत '6' Tax Saving Investments,इन्कम टॅक्स वाचवायला होईल मदत
ऑनलाईन स्वरूपात फाईल करा रिटर्न
21 दिवसांमध्ये रिटर्न फाईल करा किंवा ऑनलाईन सिस्टीमद्वारा त्याचं उत्तर द्या असं इन्कम टॅक्स विभगाने बजावलं आहे. इन्कम टॅक्स विभागाला पटेल असं उत्तर नसल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?
ऑनलाईन रिटर्न कसा भराल?
- incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर लॉग ईन सेक्शनवर क्लिक करा.
- यानंतर तुमचा पॅनकार्ड नंबर, पासावर्ड, जन्म तारीख, कॅप्चा कोड योग्यरित्या टाईप करा. त्यापुढे लॉग ईन बटणवर क्लिक करा.
- यानंतर इन्कम टॅक्स विभागाचं ई फाईलिंग होम पेज ओपन होईल.
- ई फाईल ओपन केल्यानंतर त्यामधील इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करा. आवश्यक माहिती भरा.
तुम्हांला इन्कम टॅक्स विभागाकडून अशाप्रकारची कोणतीही नोटीस आली असल्यास त्याला वेळीच उत्तर द्या किंवा तो रिटर्न भरा. अन्यथा तुम्हांला Income-tax Act, 1961 च्या अंतर्गत कारवाईला सामोरं जाणं भाग आहे.