Cat Temple In Karnataka: मांजर प्राणी नाही देव? थेट मांजरींचं मंदिर उभारत हजारो वर्षांपासून केली जाते पूजा
कर्नाटकमध्ये हे मांजरीचं पुरातन मंदिर आहे.
तुमच्या घरी पाळीव प्राणी आहे का? हल्ली बऱ्याच जणांकडे एक तरी पाळीव प्राणी असतो. त्यात कुत्रा किंवा मांजर पाळीव प्राणी असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तुम्ही तुमच्या घरच्या पाळीव प्राण्याचे लाड करत असाल, त्याला खेळायला फिरायला घेवून जात असाल, त्याच्या बरोबर खेळत असाल पण तुम्ही तुमच्या घरच्या पाळीव प्राण्याची कधी पुजा केली आहे का? किंवा कुठल्या पाळीव प्राण्याचं मंदिर असल्याचं तुम्ही ऐकल आहे का? तर हो मांजर या पाळीव प्राण्याचं मंदीर आहे आणि मांजरीची पुजा केली जाते किंबहुना मांजर हा देवाचा एक अवतार आहे. कर्नाटकमध्ये हे मांजरीचं पुरातन मंदिर आहे. हे ठिकाण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात आहे. येथे बेक्कालेले नावाचे गाव आहे. या गावातील लोक गेल्या 1000 वर्षांपासून मांजरीची पूजा करतात. मांजर हा देवीचा अवतार आहे असे येथे राहणारे लोक मानतात, त्यामुळे त्यांची येथे मांजरीची पूर्ण विधीवत पूजा केली जाते. या गावातील लोक मांजरांना मंगम्मा देवीचे रुप मानतात.
घरात मांजरीचा वास असणं किंवा मांजर आडवी गेल्यास दिवस वाईट जाणार, तुम्ही कामात अयशस्वी होणार अशी समज आहे. किंबहुना मांजर अपशकुनी असल्याचंही बोल्ल्या जात पण मांजर ही अपशकुनी किंवा केवळ एक सामान्य पाळीव प्राणी नसुन देवाचा एक अवतार आहे अशी कर्नाटकात समज आहे. तरी येथे मांजरीची विधीवत पूजा केल्या जाते आणि वर्षानु वर्षापासून मांजरीच्या पुजेची ही परंपरा कर्नाटकातील या गावात सुरु आहे. (हे ही वाचा:- केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!)
भारतातील विविध राज्यात अनोख्या संस्कृती आहे. या संस्कृतीनुसार अनेक देवांच्या पुजा केल्या जातात. त्याचप्रमाणे देवांची वाहनं असलेल्या प्राण्यांची देखील पूजा केली जाते. जसं भगवान शंकरांचं वाहन म्हणजे नंदी, श्रीगणेशाचं वाहन उंदीर, दत्त गुरुंचं वाहन गाय, दुर्गा मातेचं वाहन वाघ अशा विविध प्राण्यांना हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. तरी मांजरेचं मंदीर हे ऐकायला जरी अनोखं वाटत असलं तरी ते अस्थित्वात हे आणि श्रध्देने मांजरीची या मंदिरात पूजा अर्चना केल्या जाते.