Railway Recruitment Exam Cheating: रेल्वे परीक्षेमध्ये नकली परीक्षार्थी; बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन मधून सुटका मिळवण्यासाठी चक्क अंगठ्यावरील त्वचा दिली कापून पण 'असा' पकडला गेला!
सध्या या प्रकरणी लक्ष्मीपुरा पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
गुजरातच्या वडोदरा मध्ये झालेल्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आरसीसी लेव्हल 1 च्या परीक्षेमध्ये एका परीक्षार्थ्याने आपल्याऐवजी दुसर्याच व्यक्तीला परीक्षेला पाठवलं होतं. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन मध्ये त्याची ही गडबड पकडण्यात येऊ नये म्हणून त्याने चक्क अंगठ्याची वरच्या बाजूची त्वचा कापून त्या डमी परीक्षार्थ्याकडे दिली. पण सॅनिटायझरने त्यांची पोल खोल केली.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट नुसार, परीक्षार्थ्याचं नाव मनीष कुमार शंभुनाथ आहे. मनीष ने आपल्या जागी परीक्षा देण्यासाठी राजगुरू गुप्ता नामक व्यक्तीला पाठवलं. हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. त्यांना 24 ऑगस्टला कोर्टात दाखल केले होते. तेव्हा त्यांना कोर्टाने 3 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. हे देखील नक्की वाचा: सैनिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी बसवला 'डमी', 10 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला अटक .
22 ऑगस्टला आरसीसी लेव्हल 1 ची परीक्षा झाली. परीक्षेच्या तिसर्या शिफ्ट मध्ये 5 ते 6.30 या वेळेमध्ये परीक्षा केंद्र चौथ्या मजल्यावर होते. हॉल मध्ये प्रवेशापूर्वी आधार कार्ड द्वारा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुरू होते. या प्रक्रियेमध्ये या नकली विद्यार्थ्यांच्या व्हेरिफिकेशन मध्ये गोंधळ होत होता. कारण परीक्षा निरीक्षकाने त्याचा हात सॅनिटायझरने स्वच्छ केला होता. यामध्ये त्याच्या हातावरची स्कीन निघून गेली होती.
सध्या या प्रकरणी लक्ष्मीपुरा पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.