West Bengal Bypolls Result: पोटनिवडणुकीत भाजपचा सुफडा साफ, उमेदवरांचे डिपॉझिट जप्त; तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठे यश

त्या उलट भाजप (BJP) मात्र पुन्हा एकदा नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जाताना दिसतो आहे. एकूण चारपैकी सर्वच्या सर्व ठिकाणी तृणमूल काँग्रेस विजयी झाले आहे. तर 3 ठिकाणी भाजप उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.

TMC Chief Mamata Banerjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Bypolls Result) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. टीएमसी (TMC) ची विधानसभा मुख्य निवडणुकीतील विजयी घोडदौड पोटनिवडणुकीतही पाहायला मिळाली. त्या उलट भाजप (BJP) मात्र पुन्हा एकदा नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जाताना दिसतो आहे. एकूण चारपैकी सर्वच्या सर्व ठिकाणी तृणमूल काँग्रेस विजयी झाले आहे. तर 3 ठिकाणी भाजप उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.

पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला मिळालेल्या भरघोस यशानंतर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, बंगाल नेहमी विद्वेश आणि नकारात्मकतेच्या राजकारणावर विकास आणि एकात्मतेचीच निवड करतो. दिनहाटा आणि शांतिपूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. दिनहाटा येथून केंद्र सरकारमध्ये गृहराज्यमंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या भाजपच्या निसिथ प्रामाणिक यांनी राजीनामा दिला होता. तर शांतीपूर येथून भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली. (हेही वाचा, Dadra & Nagar Haveli Bypoll: दादरा-नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांचा 47,000 मतांनी दणदणीत विजय; भाजप, काँग्रेस धक्क्याला)

कोलकातामध्ये येणारी खरदह येथून कोलकाता येथील माजी महापौर सोवन्देब चट्टोपाध्याय निवडणूक लढवत होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी कोलकाता येथील भवानीपूर जागा सोडली होती. त्यांनी (ममता बॅनर्जी) नंदीग्राम येथून आपल्या पराभवानंतर सहा महिन्यात आमदार होणे आवश्यक होते. त्यामुळे सोवन्देब चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला होता. या चारही जागांवर टीएमसीने मोठा विजय मिळवला आहे. भाजपसाठी हा एक मोठा झटका मानला जातो आहे.