BYJU'S Aakash to launch IPO: बायजूस आकाश आयपीओ बाजारात लवकरच करणार लॉन्च

हा आयपीओ 2024 च्या मध्यापर्यंत लाँच होऊ शकतो असे कंपनीने सोमवारी जाहीर केले.

BYJU’S. (Photo Credits: Twitter)

भारतातील अग्रगण्य एज्युकेशन टेक स्टार्टअप, Byjus लवकरच आपली चाचणी तयारी शाखा आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच करण्याची योजना आखत आहे. हा आयपीओ 2024 च्या मध्यापर्यंत लाँच होऊ शकतो असे कंपनीने सोमवारी जाहीर केले.

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चा महसूल 2023-23 या आर्थिक वर्षात ₹900 कोटीच्या EBITDA (ऑपरेशनल नफा) सह ₹4,000 कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे IPO लाँचसाठी अधिकृत मंजुरी देखील Byju's च्या बोर्डाने दिली आहे. त्या अनुशंघाने कंपनीने निवेदनात योजनेची कालमर्यादा सांगत असे म्हटले आहे की, IPO साठी मर्चंट बँकर्सची नियुक्ती लवकरच जाहीर केली जाईल जेणेकरुन सूचीबद्ध प्रक्रिया पुढे नेली जाईल. (हेही वाचा, High Court On Education Loan: विद्यार्थ्याचा CIBIL स्कोअर कमी असला तरी बँकांना शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही- केरळ हायकोर्ट)

ट्विट