Buxar Horror: तरुणीने प्रियकराला घरी बोलावून कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट; तरुणाला तसेच मृतावस्थेत सोडून काढला पळ
या प्रकरणाबाबत डॉ.व्ही.के.सिंह म्हणाले की, रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याची जखम लवकर बरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Girl Cuts Boyfriend's Private Part: बिहारमधील (Bihar) बक्सरमधून (Buxar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आधी तिच्या 25 वर्षीय प्रियकराला घरी बोलावले आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट (Private Parts) कापला. वृत्तानुसार, अनिल गोंड असे पिडीत प्रियकराचे नाव आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील व्हीके ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तक्रार दाखल केली असून, त्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अहवालानुसार, पीडित तरुणाचा भाऊ प्रमोद कुमार चौधरी यांनी सांगितले की, अनिलला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला होता, त्यानंतर तो डुमराव पोलीस स्टेशन हद्दीतील चतुरशालगंज येथील तिच्या घरी गेला होता. अनिल जेव्हा मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा तिने हल्ला करून तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर अनिल बेशुद्ध झाला. अनिलला मृत समजून तरुणीने त्याला रस्त्यावर सोडून पळ काढला.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुण उपविभागीय रुग्णालयात पोहोचला. त्याची गंभीर परिस्थिती पाहता त्याला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा: Bengaluru Shocker: बेंगलूरू मध्ये पत्नीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न मिळाल्याने झोपेत असलेल्या पतीवर केले चाकू हल्ले!)
मुलीसोबतच तिच्या कुटुंबीयांवरही तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाबाबत डॉ.व्ही.के.सिंह म्हणाले की, रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याची जखम लवकर बरी करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, प्रायव्हेट पार्टची समस्या खूप गंभीर आहे. अशा स्थितीत खराब झालेल्या प्रायव्हेट पार्टवर मोठ्या ऑपरेशन अंतर्गत उपचार केले जात आहेत.