IPL Auction 2025 Live

Burkha Ban In India: बुरखाबंदी सोबत घुंगट पण बंद करा म्हणणाऱ्या जावेद अख्तर यांना करणी सेनेची घरात घुसून मारण्याची धमकी

जावेद अख्तर यांनी घुंगट बंदीवर केलेल्या विधानावर नाराजीची व्यक्त करत करणी सेनेने जावेद यांना थेट घरत घुसून मारण्याची धमकी दिली आहे, राजस्थानी संस्कृतीचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका अशी चेतावणी देखील करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंग सोळंकी यांनी एका व्हिडीओ मार्फत दिली

Karni Sena Threatens Javed Aktar Over Comment Made On Ghungat Ban (Photo credits: Youtube/facebook)

श्रीलंकेत (Srilanka) झालेल्या साखळी बॉम्ब हल्ल्याच्या(Serial Bomb Attacks)  पार्श्वभूमीवर सुरक्षा हेतूने मुस्लिम महिलांना बुरखा वापरण्यावर बंदी (Burkha Ban) घालण्यात आली होती, यावर भारतातही अशा प्रकारची बंदी लागू करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या Shivsena) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) भाजपा कडे केली. बुरखा बंदीच्या निर्णयावर देशभरातून दुहेरी प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या, एकीकडे केरळ मधील कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी आणण्यात आली तर काहींनी हा निर्णय धार्मिक भेदभावाला खतपाणी देणारा आहे असंही म्हंटल होत. अशातच काही दिवसांपूर्वी प्रख्यात गीतकार व लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बुरख्यासोबतच घुंगट घेण्याच्या पद्धतीवरही बंदी आणली जावी अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र यावर करणी सेनेने (Karni Sena) नाराजी दर्शवत या विधानासाठी माफी मागा अन्यथा तुम्हाला घरात घुसून मारू अशी धमकी दिली आहे  केरळ: कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे आदेश

 

खरतर बुरखा व घुंगट दोन्हीच्या बंदीला समर्थन करत आपली भूमिका मांडणारे ट्विट जावेद यांनी केले होते, ज्यात 'बुरख्याबाबत माझे ज्ञान खूपच कमी आहे कारण ज्या घरात मी राहिलो त्या घरातील सर्व स्त्रिया या कामावर जाणाऱ्या होत्या. मी कधीही घरामध्ये बुरखा पाहिलेला नाही. इराक हा मोठा कट्टर देश आहे. मात्र, तिथे महिला आपला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा, मात्र चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले, असे सांगितले होते.

मात्र बुर्ख्यासोबत राजस्थान किंवा भारतातील अन्य भागात पाळल्या जाणाऱ्या घुंगट पद्धतीवर देखील सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी बंदी घालावी,यामुळे स्त्रियांचे सबलीकरण होण्यास मदत होईल. यामध्ये कोणत्याही धर्माच्या विरुद्ध बोलण्याचा मानस नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे असे देखील जावेद यांनी स्पष्ट केले होते.

जावेद अख्तर ट्विट

मात्र या मागणीवर नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवणारा एक व्हिडीओ करणी सेनेकडून पोस्ट करण्यात आला. करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी 'तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू इतकंच नव्हे तर तुमची जीभ हासडून हातात देऊ'  अशी धमकी देत 'आपल्या मर्यादा ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका, अशी चेतावणी जावेद अख्तर यांना दिली