Budget 2020: बजेट सादर होण्यापूर्वी सरकारला दिलासा, 1 कोटींच्या पार GST वसूल
कारण जानेवारी महिन्यात गुड्स अॅन्ड सर्विसेस टॅक्स म्हणजेच जीएसटीची वसूली 1.10 लाख कोटी रुपयांच्या पार पोहचली आहे.
यंदाचे बजेट 2020-21 सादर होण्यापूर्वी आर्थिक स्तरावर सरकारला दिलासा मिळाला आहे. कारण जानेवारी महिन्यात गुड्स अॅन्ड सर्विसेस टॅक्स म्हणजेच जीएसटीची वसूली 1.10 लाख कोटी रुपयांच्या पार पोहचली आहे. याबाबत न्यूज एजंसी पीटीआय यांना अर्थमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जुलै 2017 मध्ये देशभरात जीएसटी लागू करण्यात आला. त्यानंतरचा ही सर्वाधिक जीएसटीची वसूली करण्यात आली आहे.
यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये 1.13 लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला होता. जो आतापर्यंचा उच्च स्तर आहे. सातत्याने तिसऱ्य महिन्यात जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटीच्या पार पोहचले आहे. दरम्यान गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शन 1 लाख 3 हजार 184 कोटी रुपये झाला होता. तसेच नोव्हेंबर महिन्यात जीएसटीची एकूण वसूली 1,03, 492 कोटी रुपये झाली.
शुक्रवारी डिसेंबर 2019 मधील इंडस्ट्रीचे आकडे सुद्धा जारी करण्यात आले. कोर इंडस्ट्री मध्ये वाढ होत डिसेंबरमध्ये 1.3 टक्क्यांवर पोहचला होता. या आकडेवरुन असे दिसून येते की, सातत्याने चार महिन्याच्या गिरावटीला ब्रेक लागला आहे. सध्या सुरु असलेल्या आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर महिन्याच्या दरम्यान कोर इंडस्ट्रिची वाढ 0.2 टक्के राहिली जी एका वर्षापूर्वी याच काळात 4.8 टक्के होती.(Budget 2020 Live News Updates: केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 संसदेमध्ये सादर होण्यापूर्वी 10.15 वाजता होणार कॅबिनेटची बैठक)
तर वर्षे 2019-2020 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) शुक्रवारी सादर करण्यात आला. त्यामध्ये मागील आर्थिक वर्षात (2018-19) जीडीपी वाढ 6.8% नव्हे तर 6.1% होती.खाण, उत्पादन आणि शेती क्षेत्रातील कामकाजातील मंदीमुळे या वाढीवर तीव्र परिणाम झाला. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपी वाढ केवळ 4.5% होती. 6 वर्षातील ही तिमाहीतील सर्वात कमी वाढ आहे. ही सलग पाचवी तिमाही होती, जिथे ग्रोथ रेट घटला आहे. सरकारने डिसेंबरच्या तिमाहीतील आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.