धक्कादायक! दोन तरुणांचा पाळीव कुत्र्यावर पाशवी बलात्कार; रोज होणाऱ्या अत्याचारामुळे जनावराचा मृत्य

दोन तरुणांनी एका कुत्र्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. एकदाच नाही तर अनेकवेळा हे दोघे या कुत्र्यावर बलात्कार करीत असत

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एटा (Etah) येथून कथित बलात्काराचे (Rape) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना बलात्काराच्या इतर घटनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी एखादी स्त्री अथवा पुरुष नाही तर निष्पाप जनावर वासनेचा बळी पडले आहे. दोन तरुणांनी एका कुत्र्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. एकदाच नाही तर अनेकवेळा हे दोघे या कुत्र्यावर बलात्कार करीत असत. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात कुत्र्याचा मृत्य झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने या घटनेचा उलगडा झाला. या आरोपींवर पशु क्रूरता अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कोतवाली मलावनची आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पुरवा गावाचे रहिवासी असणाऱ्या नीरज पाठक यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. आपल्याच गावातील दोन तरुण, नीरज दीक्षित आणि उमेश चंद्र यांनी पाळीव प्राण्यावर बलात्कार केल्याचा आरोप पाठक यांनी केला होता. या दोघांनी आपल्या कुत्र्यावर बलात्कार केला त्यामुळेच त्याचा मृत्य झाला असे पाठक यांचे म्हणणे आहे. हे दोन युवक पाठक यांच्या कुत्र्यावर रोज बलात्कार करत असत, याची माहिती सीसीटीव्हीच्या आधारे प्राप्त झाली. (हेही वाचा: कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी)

स्थानिक पोलिसांनी आपले म्हणणे एकूण घेतले नाही ऐकले नाही, असा आरोपही नीरज पाठक यांनी केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर जिल्ह्याचे एडिशनल पोलिस अधीक्षक संजय कुमार यांनी निरीक्षकांकडे, संबंधित विभागात गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. याआधी चेन्नई येथे एक कुत्र्याचे पिल्लू विकृत व्यक्तिच्या वासनेचा बळी ठरले होते. एका सजग महिलेच्या सतर्कतेमुळे प्रकरणाचा भांडाफोड झाला.